Best Food For Piles: मुळव्याधीसाठी ऑपरेशन सांगितलंय? मग 'हे' 10 पदार्थ आतड्यांतील घाण करतील मुळापासून साफ

High Fiber Foods For Piles: सध्याची जीवनशैलीमुळे आणि बाहेरी खाण्याचा वाढलेलं प्रमाण त्यामुळे मूळव्याध ही गंभीर समस्या निमार्ण झाली आहे. अनेक रुग्णांवर ऑपरेशन करण्याची वेळ आली आहे. अशात ही वेळ तुमच्यावर येऊन यासाठी आतड्यांमधील घाण मुळापासून साफ करण्यासाठी हे पदार्थ सेवन करा. 

May 17, 2023, 12:15 PM IST

High Fiber Foods For Piles: तासांतास बसून काम आणि बाहेरील चमचमीत खाणं, शिवाय अवेळी जेवन यामुळे अनेक जणांना मुळव्याधाचा म्हणजेच Piles hemorrhoids चा त्रास अनेकांना होत जाणवतं आहे. मूळव्याध या आजारावर अनेकांवर ऑपरेशनची वेळ येते. (Piles or hemorrhoids and constipation these 10 fiber rich foods will clean the intestinal dirt)

1/10

मूळव्याध गंभीर आजार

गरम आणि तिखट पदार्थांचे अतिसेवन केल्याने मूळव्याध होता. जेव्हा गुदाशयाच्या आसपास आणि मलाशयाच्या खालच्या भागातील नसांवर सूज येते. त्यामुळे कोंब बाहेर येतो. अशावेळी शौच करताना वेदना, जळजळ होते. काही जणांना तर रक्तस्त्राव होतो.

2/10

मूळव्याधाचे प्रकार (Types of piles)

बाह्य मुळव्याध आणि अंतर्गत मुळव्याध असे दोन प्रकार असतात. बाह्य मुळव्याध रक्तस्त्राव खूप म्हणजे खूप कमी प्रमाणात होतो. यामध्ये कोंब दिसतो आणि नसांवर सूज चढते.  तर अंतर्गत मुळव्याधीमध्ये अति प्रमाणात रक्तस्त्राव होतो. या रुग्णांपुढे ऑपरेशनची वेळ येते. 

3/10

कडधान्ये (Pulses)

फायबरयुक्त पदार्थांचा समावेश आहारात केला पाहिजे. यामध्ये डाळ, लिमा बीन्स, मटार, व्होल व्हीट ब्रेड, सर्व प्रकारच्या बेरीज आणि रताळी खाण्यावर भर दिला पाहिजे. फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्यास मलत्याग करणे सुलभ होते.

4/10

दलिया (Oatmeal)

दलिया आणि ओटमीलमधील फायबरमुळे आतडे निरोगी राहतात. एक कप दलियामध्ये  4 ग्रॅम फायबर आढळतं. या पदार्थांचं सेवन केल्यामुळे मल सहजरित्या बाहेर पडण्यास मदत होते. 

5/10

मका (Makke)

आयुर्वेदात मका हा मूळव्याधावर उपचारासाठी संजीवनी समजली जायची. फायबर  आणि अँटिऑक्सिडंट्स असलेला हा पदार्थ मूळव्याधामुळे होणारे त्रास कमी करतो. 

6/10

जवस (linseed)

जवसमध्ये β-ग्लूकेन नावाचे फायबर आढळतं. जवसाचं सेवन केल्यामुले आतड्यांचं आणि पोटाचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते, असं संशोधनात सिद्ध झालं आहे. 

7/10

पेर किंवा नाशपती (pear)

सगळ्यात फायबर हे पेर किंवा नाशपतीमध्ये आढळतं. या फळामध्ये फ्रक्टोज देखील असतं, हे फळं मूळव्याधाच्या रुग्णांसाठी संजीवनी ठरतं.   

8/10

सफरचंद (apple)

पेरनंतर अप्पलमध्ये फायबर जास्त प्रमाणात असतं. मध्यम आकारच्या फळामध्ये 4.4 ग्रॅम फायबर आढळतं. त्यामुळे मलत्याग सुभल करण्यासाठी तज्ज्ञ सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. 

9/10

वाळवलेले आलुबुखारा (Dried apricots)

वाळलेल्या आलुबुखारात सर्वाधिक फायबर असल्याने बद्धकोष्ठता आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी मदत होते. मूळव्याधावर जालीम वाळवलेले आलुबुखारा हे जालीम उपाय ठरतो. 

10/10

गव्हाचा कोंडा (Wheat bran)

रेडी टू इट ब्रान सीरिअल हे फायबरयुक्त खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. एक कप गव्हाच्या कोंड्यामध्ये 9.1 ग्रॅम फायबर असल्याचं NIH च्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)