बारावीनंतर फार्मसी केलंय? जाणून घ्या सरकारी नोकरीचे पर्याय
फार्मसीमध्ये पदवी मिळवून खाजगी तसेच सरकारी क्षेत्रात नोकरीच्या संधी शोधतात. फार्मसी कोर्स पूर्ण केल्यावर कोणत्या सरकारी नोकरी मिळतात? याबद्दल जाणून घेऊया.
Pravin Dabholkar
| Mar 11, 2024, 21:21 PM IST
Career In Pharmasy: फार्मसीमध्ये पदवी मिळवून खाजगी तसेच सरकारी क्षेत्रात नोकरीच्या संधी शोधतात. फार्मसी कोर्स पूर्ण केल्यावर कोणत्या सरकारी नोकरी मिळतात? याबद्दल जाणून घेऊया.
1/7
बारावीनंतर फार्मसी केलंय? जाणून घ्या सरकारी नोकरीचे पर्याय
2/7
कोणत्या सरकारी नोकरी?
3/7
औषध निरीक्षक
औषध निरीक्षकाला ड्रग इन्स्पेक्टर असेही म्हणतात. फार्मसी पदवीधर औषध निरीक्षक म्हणून काम करू शकतात. ते फार्मास्युटिकल उत्पादनांची गुणवत्ता आणि परिणामकारकता तपासतात. औषध निरीक्षक हे औषधांची नियामक मानकांचे तपासतात, त्याची पडताळणी करतात. औषध बाजारांमध्ये जाऊन औषध साखळीची तपासणी करतात. सर्व विक्रेते औषध कायद्यांचे पालन करतात याची खात्री करतात. लोकसेवा आयोग आणि कर्मचारी निवड आयोग (SSC) मोठ्या प्रमाणावर औषध निरीक्षकांची भरती करतात.
4/7
शासकीय रुग्णालयातील फार्मासिस्ट
सरकारी रुग्णालयांमध्ये फार्मासिस्टची नोकरी मिळणे हा एक उत्तम पर्याय आहे. औषधविक्रेते औषध वितरीत करण्यासाठी, रुग्णांना त्यांच्या वापराबद्दल समुपदेशन करतात. सरकारी रुग्णालयातील आरोग्य सेवा टीमसोबत काम करतात. हॉस्पिटलमध्ये औषधांची उपलब्धता आणि योग्य साठवण आहे का? याची पडताळणी करतात.विविध सरकारी रुग्णालयांमध्ये फार्मासिस्टच्या नोकऱ्यांची जाहिरात दिली जाते. यामध्ये निवड होण्यासाठी उमेदवारांना लेखी परीक्षा आणि मुलाखतीचा टप्पा पार करावा लागतो.
5/7
संशोधन अधिकारी
संशोधन अधिकाऱ्यास रिसर्च ऑफिसर असं म्हणतात. भारत सरकारच्या प्रयोगशाळांमध्ये फार्मास्युटिकल संशोधन अधिकाऱ्यांची नेहमीच मागणी असते. आरोग्य उपक्रमांमध्ये हे एक महत्त्वाचे पद मानले जाते. संशोधन अधिकारी हेऔषध शोध आणि विकासासाठी काम करतात. ते नवीन औषधांवर संशोधन करतात आणि त्यासाठी लागणारे फॉर्म्युलेशन विकसित करतात. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR), वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) या ठिकाणी संशोधन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते.
6/7
दक्षता अधिकारी
फार्मोकोव्हिजिलन्स ऑफिसर म्हणजेच दक्षता अधिकारी. फार्मसीचा अभ्यास केल्यानंतर, उमेदवार फार्माकोव्हिजिलन्स अधिकारी म्हणून नोकरी मिळवू शकतात. दक्षता अधिकारी हे विविध उत्पादनांच्या सुरक्षिततेचे परीक्षण आणि मूल्यांकन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. औषधांच्या प्रतिकूल प्रतिक्रिया गोळा करणे आणि विश्लेषण अहवाल तयार करणे हे देखील त्यांचे काम आहे. भारतात केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था, राष्ट्रीय औषधनिर्माण शिक्षण आणि संशोधन संस्था, राज्य औषध नियंत्रण विभाग आणि ICMR सक्रियपणे दक्षता अधिकाऱ्यांची नियुक्ती करतात. तुम्ही 80% वाचले आहे.
7/7