'तारक मेहता' सोडल्याच्या 6 वर्षानंतर दयाबेन 'अशी' दिसतेय, तुम्ही ओळखू शकणार नाही

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका खूपच लोकप्रिय आहे. त्यातील टप्पू, टप्पूचे पप्पा, बाबुजी, दयाबेन अशी सर्व पात्र आपल्या चांगलीच ओळखीची झाली आहेत. यातील अनेक पात्र सध्या काम करत नाहीत. पण त्यांनी साकारलेल्या भूमिका आपण कधीच विसरु शकत नाही. दयाबेनची भूमिका देखील यापैकीच एक आहे.

| Jul 18, 2023, 11:55 AM IST

Disha Vakani TMKOC: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका खूपच लोकप्रिय आहे. त्यातील टप्पू, टप्पूचे पप्पा, बाबुजी, दयाबेन अशी सर्व पात्र आपल्या चांगलीच ओळखीची झाली आहेत. यातील अनेक पात्र सध्या काम करत नाहीत. पण त्यांनी साकारलेल्या भूमिका आपण कधीच विसरु शकत नाही. दयाबेनची भूमिका देखील यापैकीच एक आहे.

1/7

'तारक मेहता' सोडल्याच्या 6 वर्षानंतर दयाबेन 'अशी' दिसतेय, तुम्ही ओळखू शकणार नाही

TMKOC Dayaben looks change  after 6 years leaving Taarak Mehta serial you wont recognize

Disha Vakani TMKOC: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका खूपच लोकप्रिय आहे. त्यातील टप्पू, टप्पूचे पप्पा, बाबुजी, दयाबेन अशी सर्व पात्र आपल्या चांगलीच ओळखीची झाली आहेत. यातील अनेक पात्र सध्या काम करत नाहीत. पण त्यांनी साकारलेल्या भूमिका आपण कधीच विसरु शकत नाही. दयाबेनची भूमिका देखील यापैकीच एक आहे.

2/7

ही तिच 'दयाबेन' आहे का?

TMKOC Dayaben looks change  after 6 years leaving Taarak Mehta serial you wont recognize

साधारण 6 वर्षांपूर्वी दयाबेनची भूमिका साकारणाऱ्या दयाबने म्हणजे दिशा वाकानीने ही मालिका सोडली होती. घरगुती कारणांमुळे मालिका सोडल्याचे तिने त्यावेळी सांगितले होते. दरम्यान आता दिशा वाकानीचा एक फोटो समोर आला आहे. तो पाहून ही तिच 'दयाबेन' आहे का? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो.   

3/7

व्लॉगमध्ये दिसली

TMKOC Dayaben looks change  after 6 years leaving Taarak Mehta serial you wont recognize

तारक मेहता का उल्टा चष्मा पाहत असताना दयाबेन शोमध्ये कधी प्रवेश करणार? असा प्रश्न हमखास विचारला जातो. या भूमिकेला आयकॉनिक बनवणारी दिशा वाकानी केवळ शोपासून दूरच नाही तर लाइमलाइटपासूनही दूर आहे. पण अलीकडेच ती एका व्लॉगमध्ये दिसली. तिच्या चाहत्यांसाठी हा मोठा क्षण होता. 

4/7

दयाबेन बदललेली दिसली

TMKOC Dayaben looks change  after 6 years leaving Taarak Mehta serial you wont recognize

एका ब्लॉगरने नुकतीच दिशा वाकाणीच्या सोसायटीत जाऊन तिची भेट घेतली. त्यांच्या भेटीचा व्हिडीओ युट्यूबवर शेअरदेखील करण्यात आला आहे. या व्हिडीओत दिशाने खूप छान संवाद साधला आहे. ती खूप छान बोलताना दिसत आहे. 'मेक-अप वगैरे कॅमेऱ्यात कर... कारण मला दोन मुलं आहेत, त्यामुळे मेकअप करायला वेळ मिळत नाही' असं सांगताना ती ब्लॉगरला सांगताना दिसत आहे.

5/7

दिशा संसारात मग्न

TMKOC Dayaben looks change  after 6 years leaving Taarak Mehta serial you wont recognize

2017 मध्ये दिशा वकानीने तारक मेहता का उल्टा चष्मा मालिका सोडली. कारण ती आई होणार होती. त्यानंतर तिने एका मुलीला जन्म दिला. पण 6 वर्षांनंतरही ती शोमध्ये परतली नाही. त्यामुळे चाहत्यांना तिची खूप आठवण येत आहे. दिशा वकानीने शोमध्ये परतावे अशी त्यांची इच्छा आहे. 

6/7

पुन्हा आई झाली

TMKOC Dayaben looks change  after 6 years leaving Taarak Mehta serial you wont recognize

या वर्षाच्या सुरुवातीला दिशा लवकरच या शोमध्ये दिसणार आहे, अशी बातमी समोर आली होती. पण ती पुन्हा आई झाली आहे आणि यावेळी तिने एका मुलाला जन्म दिला आहे, अशी गोड बातमी समोर आली. त्यानंतर दिशा तारक मेहतामध्ये पुनरागमन करेल या बातम्यांना पूर्णविराम मिळाला.

7/7

खास शैलीने व्यक्तिरेखेमुळे आयकॉनिक भूमिका

TMKOC Dayaben looks change  after 6 years leaving Taarak Mehta serial you wont recognize

दिशा वाकाणीने साकारलेली दयाबेनची भूमिका क्वचितच कोणी साकारु शकेल. आपल्य बोलण्याची स्टाइल, इतर पात्रांसोबत संवाद साधण्याची पद्धत हे सर्वच तिने आयकॉनिक बनवले आहे.याची हुबेहूब नक्कल करणे कोणत्याही कलाकाराला सोपे जाणार नाही.