ट्रिपवर जाण्याआधी घ्या 'या' 7 गोष्टींची काळजी, अन्यथा ख्रिसमसची सुट्टी जाईल रुग्णालयात

Tips for a person going on a solo trip : वर्षाचा शेवट आला आहे. उद्या 25 डिसेंबर असला तरी त्याआधीच विकेंडची सुरुवात झाली आहे. अनेकांनी आता ट्रिप प्लॅन केल्या आहेत. अशात तुमचं अजून कोणतंही ठिकाण ठरलेलं नसेल किंवा अजूनही प्लॅनमध्ये बदल होत आहेत. तर आजच या गोष्टी घ्या लक्षात नाही तर तुम्हाला ख्रिसमसची सुट्टी ही रुग्णालयात घालवावी लागू शकते. जाणून घ्या ही आहेत कारण... आणि काय काळजी घ्यायला हवी.

Diksha Patil | Dec 24, 2023, 08:02 AM IST
1/7

सोलो ट्रॅव्हलरसाठी खास गोष्ट

tips for a person going on a solo trip

जर तुम्ही एकटे थंडीच्या ठिकाणी फिरायला जाणार असालत तर हार्ट अटॅक, बीपी सारख्या अचानक आलेल्या इमरजन्सी समस्यांसाठी कोणत्या गोळ्या घ्यायला हव्या याविषयी डॉक्टरांकडून माहिती घ्या. 

2/7

कुटुंबाचा फोन नंबरची नोंद

tips for a person going on a solo trip

कुटुंबाचा फोननंबर काय आहे त्याची एक लिस्ट तुमच्या बॅगमध्ये ठेवा त्याशिवाय तुम्हाला कोणता आजार आहे याविषयी देखील नोंद ठेवा. जर तुम्हाला चक्कर आली आणि अशात वेळ वाया न जाता. तुमच्यावर उपचार सुरु होऊ शकतो. 

3/7

बीपी मॉनिटर

tips for a person going on a solo trip

जर तुम्हाला बीपीचा त्रास असेल किंवा डायबिटीज असेल तर हे दोन्ही मोजण्याची किटसोबत ठेवा. 

4/7

जात असलेल्या ठिकाणाविषयी माहित घ्या

tips for a person going on a solo trip

तुम्ही ज्या ठिकाणी जात आहात, तिथलं तापमान आणि कशी तयारी करून तिथे गेलं पाहिजे याची संपूर्ण माहिती घ्या. 

5/7

स्वच्छतेची काळजी

tips for a person going on a solo trip

स्वत: च्या स्वच्छतेची काळजी घेण्यासाठी सतत सॅनिटायझरनं हात साफ करत रहा. मास्क लावा. कोणत्याही लोकांसोबत लगेच मिसळू नका. त्याचं कारण आजकाल आजार हे लवकर पसरत आहेत. 

6/7

डॉक्टरांचा सल्ला

tips for a person going on a solo trip

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिरायला जाण्याआधी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्याल. डॉक्टरांकडून एकदा तुमच्या आरोग्याची तपासनी करून घ्या. 

7/7

प्रेग्नंट महिलांनी घ्यावी खास काळजी

tips for a person going on a solo trip

कुठेही जात असताना प्रेग्नंट महिलांनी सर्वाधिक काळजी घेणं गरजेचं आहे. (All Photo Credit : Freepik)