'रोशन' कुटुंबातील 'तो' ज्यानं अभिनय नाही तर 'या' क्षेत्रात करिअर करत कमावली कोट्यावधींची संपत्ती

बॉलिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्माते राकेश रोशन यांचे भाऊ आणि हृतिक रोशनचे काका यांना खूप कमी लोक ओळखतात. त्यांचे नाव राजेश रोशन असे आहे. राजेश रोशन हे लोकप्रिय कंपोजर आहेत. त्यांनी जवळपास 50 वर्ष या क्षेत्रात काम केलं आहे. चला तर जाणून घेऊया त्यांच्या आयुष्याशी संबंधीत काही खास गोष्टी...

Diksha Patil | Dec 08, 2024, 11:56 AM IST
1/7

काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सनं एक घोषणा केली की आता ते लवकरच बॉलिवूडमधील एका कुटुंबावर डॉक्यूमेंटी सीरिज बनवणार आहेत. यावेळी त्यांनी रोशन कुटुंबाची निवड केली आहे. सगळ्यांनाच राकेश रोशन ते हृतिक रोशन आणि आता हृतिकची मुलं यांच्याविषयी माहिती आहे. पण 4-5 लोकांचं मिळून कुटुंब होत नसतं. या सीरिजच्या निमित्तानं राकेश रोशन आणि त्यांचा भाऊ राजेश रोशन यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र येणार आहे. राजेश रोशन हे देखील तितकेच लोकप्रिय आहेत. 

2/7

राजेश रोशन यांना अभिनय किंवा मग दिग्दर्शनासाठी लोक ओळखत नाही किंवा त्यांनी त्या क्षेत्रात काम केलं असं नाही. तर त्यांची ओळख ही एक कंपोजर म्हणून आहे. आज आपण त्यांच्या विषयी जाणून घेणार आहोत. 

3/7

राजेश रोशन यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत 50 वर्ष करिअर केलं. राजेश हे 18 वर्षांचे होते त्यावेळी महमूद यांनी त्यांना कंपोजर म्हणून ब्रेक दिला होता. 1974 मध्ये त्यांनी 'कुंवारा बाप' या चित्रपटासाठी कंपोजिशन केलं होतं. 

4/7

राजेश रोशन यांनी करिअर सुरु केल्याच्या दोन वर्षांनंतर 'जूली' या चित्रपटासाठी कंपोजर म्हणून पहिला फिल्मफेयरचा पुरस्कार जिंकला. त्यानंतर त्यांनी मागेवळून पाहिलं नाही. या पुरस्कारानंतर त्यांनी आरडी बर्मन यांच्या 'शोले' आणि 'खेल खेल में' या चित्रपटांसाठी गाणी केली. 

5/7

राजेश रोशन हे 69 वर्षांचे आहेत. त्यांच्या पत्नीचं नाव कंचन रोशन आहे. ते कॉस्ट्यूम डिझायनर आहेत. त्यांनी 'क्रेजी 4' आणि 'किंग अंकल' सारख्या चित्रपटांसाठी काम केलं आहे. त्यांना दोन मुलं आहेत एक मुलगा एहसान रोशन आणि एक मुलगी असून पश्मीना रोशन असं आहे.  

6/7

राजेश यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांना संगीत बद्ध केलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमिताभ बच्चन यांना चित्रपटात गाणं गाण्यासाठी कोणी प्रेरित केलं असेल तर ते दुसरे कोणी नसून राजेश रोशन आहेत. त्यानंतरच अमिताभ यांनी संगीत क्षेत्रात पुढे आले. 

7/7

लवकरच येणाऱ्या 'द रोशंस' या सीरिजमध्ये राकेश रोशन आणि राजेश रोशन यांचं संपूर्ण कुटुंब दिसणार आहे. सगळ्यांना रोशन कुटुंब म्हटलं की फक्त डोळ्यासमोर कोणी येत असेल तर राकेश रोशन आणि हृतिक रोशनची आठवण येते. पण राजेश रोशन यांनी केलेल्या कारकिर्दिची कोणालाही आठवण नाही.