मुकेश अंबानी यांना 'या' व्यक्तीने लावला चूना

Jan 15, 2021, 14:20 PM IST
1/4

फर्जीवाड़ा करने वाले की संपत्ति कुर्क

फर्जीवाड़ा करने वाले की संपत्ति कुर्क

रिलायन्स इंडस्ट्री कंपनीला धोका देणाऱ्या कल्पेश दफ्तरीची कंपनी संकल्प क्रिएशन प्रायवेट लिमिटेड (Sunkkalp Creation) ची ४.८७ करोड रुपयांची संपती कुर्क केली आहे. कुर्क केलेल्या या संपत्तीत मुंबईत एक व्यावसायिक कर्मशिअल (Commercial Complex) सोबतच राजकोटमध्ये चार कर्मशिअल प्रॉपर्टीचा समावेश आहे. 

2/4

कसा लावला रिलायन्स इंडस्ट्रीला चूना

कसा लावला रिलायन्स इंडस्ट्रीला चूना

ED ने CBI कडून दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर PMLA ने तपास सुरू केला आहे. ED ने सांगितलं की, कल्पेश दफ्तरीने काही लोकांची मदत घेऊन विशेष कृषी आणि ग्राम उद्योग योजनेत (Vishesh Krishi and Gram Udyog Yojana Licences) (VKGUY)  १३ लायसन्सचा घोटाळा केला आहे. या लायसन्सला हिंदुस्तान कॉन्टिनेंटल लिमिटेड (Hindustan Continental) या कंपनीचं चलन तयार करून रिलायंस इंडस्ट्रीज (RIL) ला विकलं  

3/4

६.८ करोड रुपयांचा लावला गंडा

६.८ करोड रुपयांचा लावला गंडा

तपासात मिळालेल्या माहितीनुसार, १३ लायसन्स विकून ६.८ करोड रुपये मिळाले. हे पैसे एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत फिरवण्यात आले. कल्पेश दफ्तरीसोबत या प्रकरणात नियाज अहमद, पीयूष वीरमगामा, विजय गढिया ही नावे पुढे आली आहेत. तसेच तपासात ही देखील माहिती मिळाली की, या पैशांचा वापर कल्पेश दफ्तरी आणि इतर लोकांनी केला आहे.   

4/4

धोक्यासंदर्भात PMLA कडून तपास सुरू

धोक्यासंदर्भात PMLA कडून तपास सुरू

ANI ने दिलेल्या माहितीनुसार, ED ने या संदर्भात अधिकृतरित्या प्रसिद्ध पत्रकरही जाहिर केलं आहे. ED ने सांगितलं आहे की, CBI ने FIR दाखल केली आहे. CBI ने IPC ४२०,४६७,४६८, ४७१, ४७७Aसोबतच प्रिवेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट १९८८ च्या अंतर्गत १३(२) आणि १३ (१) (d) तक्रार दाखल केली  आहे. यावर आता ED तपास सुरू करत आहे.