Photos: चौथीत शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्याला शाळेनेच दिली 90 लाखांची Mercedes कारण...

School Give 90 Lakh Rs Car To This Kid: सामान्यपणे शाळा सोडून दिल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना शाळेकडून फारसं महत्त्व दिलं जात नाही आणि त्या मुलांनाही शाळेकडून फारशी अपेक्षा नसते. मात्र एका भारतीय तरुणाबरोबर याच्या अगदी विपरित गोष्ट घडली आहे. त्याचबद्दल जाणून घेऊयात...

| Nov 09, 2024, 14:28 PM IST
1/15

gukeshcargift

हा संपूर्ण प्रकार आपल्या देशात म्हणजेच भारतात घडलाय असं तुम्हाला सांगितल्यास विश्वास बसणं कठीणच जाईल पण हे खरं आहे. नक्की हे प्रकरण काय आहे आणि हा मुलगा कोण आहे पाहूयात...

2/15

gukeshcargift

भारतीय क्रीडा क्षेत्रात रस असलेल्या व्यक्तीला विश्वनाथ आनंद हे नाव ठाऊक नाही असं शक्यच नाही. खरं तर भारतातील बुद्धीबळ म्हटल्यावर सर्वात आधी डोळ्यासमोर येणारा आणि अंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणारा हा एकमेव चेहरा अनेक भारतीयांना मागील अनेक वर्षांपासून ठाऊक होता.

3/15

gukeshcargift

अनेक वर्ष विश्वनाथ आनंदने अनेक अंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट करत भारतीयांना अभिमान वाटेल अशी कामगिरी केली. अनेक वर्ष विश्वनाथ आनंद इतकं यश बुद्धीबळामध्ये कोणत्याही भारतीयाला मिळवता आलं नाही. 

4/15

gukeshcargift

मात्र 2024 मध्ये असं काही घडलं की आता विश्वनाथ आनंदचे एक नाही अनेक वारस मिळाल्यासारखं वाटतंय.

5/15

gukeshcargift

याच अनेक नावांमध्ये समावेश होतो तो भारताचा ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू डी. गुकेश या 18 वर्षीय तरुणाचा. आतापर्यंत केवळ विश्वनाथ आनंदला ज्या स्पर्धा जिंकता आल्यात त्यापैकी अनेक स्पर्धा गुकेशने लहान वयातच जिंकल्यात.

6/15

gukeshcargift

नुकत्याच भारताने बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2024 च्या स्पर्धेमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदाकवर नाव कोरलं. भारताच्या या संघात गुकेश डी, आर प्रज्ञानंद, अर्जुन इरिगसी, विदित गुजराथी, पेंटाला हरिकृष्ण आणि श्रीनाथ नारायणन यांचा समावेश होता.

7/15

gukeshcargift

अर्जुन इरिगसी आणि डी गुकेश यांनी आपापल्या सामन्यांमध्ये विजय मिळवल्यानंतर आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या चीनला यूएसए विरुद्ध दोन गुणांचा फटका बसल्यानंतर भारताचे ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावल्याचं निश्चित झालं. या विजयानंतर ही टीम पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही भेटली होती.

8/15

gukeshcargift

डी. गुकेशने ‘कँडिडेट्स’ स्पर्धा वयाच्या 17 व्या वर्षी जिंकली. ही स्पर्धा जिंकणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला. विश्वनाथ आनंद नंतर ही स्पर्धा जिंकणारा तो पहिल्याच भारतीय बुद्धीबळपटू ठरलेला. लहान वयातच त्याने मोठं यश मिळवलं असलं तरी यासाठी त्याने बराच त्यागही केला आहे.  

9/15

gukeshcargift

डी. गुकेशने मध्यंतरी 'चेस बेस इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपलं बालपण इतर सामान्य मुलांप्रमाणे गेलं नाही असं सांगितलं. चौथीनंतर डी. गुकेश नियमितपणे शाळेत जात नव्हता. मात्र याचा त्याला आता पश्चाताप होत नाही.

10/15

gukeshcargift

आपण अभ्यासात फार हुशार होतो. जोपर्यंत आपण नियमितपणे शाळेत जात होतो तोपर्यंत आपण वर्गातील पहिला क्रमांक कधीच सोडला नाही, हे ही डी. गुकेशने आवर्जून सांगितलं. मात्र अभ्यास किंवा बुद्धीबळ यापैकी एक निवडण्याची वेळ आली तेव्हा डी. गुकेशने बुद्धीबळ निवडलं.

11/15

gukeshcargift

डी. गुकेशने शाळा सोडली तरी त्याच्या शाळाने त्याचं प्रत्येक यश फार उत्साहाने साजरं केलं. ज्यावेळेस गुकेश ‘कँडिडेट्स’ स्पर्धा जिंकून भारतात परतला होता तेव्हा शाळेने मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. वेलमल विद्यालय आयनंबक्कम असं गुकेशच्या शाळेचं नाव आहे.   

12/15

gukeshcargift

गुकेश ‘कँडिडेट्स’ स्पर्धा जिंकल्याबद्दल त्याच्या शाळेने त्याला 90 लाख रुपयांची मर्सिडीज बेन्झ ही आलिशान कार भेट म्हणून दिली होती.  

13/15

gukeshcargift

केवळ गुकेशच नाही तर चेस- वर्ल्डकप स्पर्धेमध्ये दुसऱ्या स्थानी राहिलेला भारतीय ग्रॅंडमास्टर आर प्रज्ञानंदने आणि विश्वानाथ आनंद हे दोघेही वेलमल विद्यालय आयनंबक्कमचेच विद्यार्थी आहेत.   

14/15

gukeshcargift

‘‘मला फारसे छंद नाहीत. त्यामुळे घरी असतानाही मी थोडाफार सराव करतोच. परंतु, सतत खेळत राहिल्यास ऊर्जा संपण्याची आणि थकवा जाणवण्याची भीती असते. याच कारणास्तव स्पर्धा खेळत नसताना मी सहा ते आठ तासच सराव करतो," असं गुकेशने सांगितलं.

15/15

gukeshcargift

"तसेच दडपणाचा खेळावर परिणाम होऊ नये यासाठी मी योग आणि ध्यान करतो. कारकीर्दीच्या सुरुवातीला मी दडपणाचा सामना करण्यात कमी पडायचो. आता अनुभवाने मी अधिक परिपक्व झालो आहे.’’