टीम इंडियाला 20 कोटी अन् तिला एकटीला 30 कोटी, ते ही एका दिवसात... 'ही' तरुणी कोण?

Girl Win Bigger Than Entire Team India: संपूर्ण भारतीय संघाने जितका पैसा जिंकला नाही तितका पैसा या एका मुलीने जिंकला आहे आणि तो सुद्धा एका दिवसामध्ये मैदानात घाम गाळूनच, जाणून घ्या कोण आहे ही तरुणी....

Swapnil Ghangale | Sep 10, 2024, 11:19 AM IST
1/12

arynasabalenka

जगभरामध्ये सध्या या तरुणीने तिच्या कामगिरी सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. भारतीय संघालाही कमाईमध्ये मागे टाकणारी ही तरुणी आहे तरी कोण जाणून घेऊयात....

2/12

arynasabalenka

भारतीय संघाने नुकत्याच जिंकलेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारतीय क्रिकेट संघाला जेतेपदाचा मानकरी म्हणून घसघशीत रक्कम दिली.  

3/12

arynasabalenka

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला आयसीसीने 2.45 मिलियन अमेरिकी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार 20 कोटी 42 लाख रुपये देण्यात आले.  

4/12

arynasabalenka

मात्र संपूर्ण टीम इंडियाला मिळालेल्या या रक्कमेपेक्षा अधिक रक्कम दोनच दिवसांपूर्वी एक 26 वर्षीय मुलीने कमाईच्याबाबतीत भारतीय संघालाही मागे टाकलं आहे.  

5/12

arynasabalenka

5 मे 1998 ला जन्मलेल्या या तरुणीने एकाच दिवसामध्ये तब्बल 36 लाख अमेरिकी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार 30 कोटी 22 लाख रुपयांची रक्कम बक्षिस म्हणून जिंकली आहे.   

6/12

arynasabalenka

बरं या तरुणीने ही रक्कम लॉटरी किंवा नशिबाच्या जोरावर नाही तर मैदानात घाम गाळून जिंकली आहे.

7/12

arynasabalenka

आपण ज्या खेळाडूबद्दल बोलतोय तिचं नाव आहे, अरिना सबालेन्काने!  

8/12

arynasabalenka

अरिना ही प्रोफेश्नल टेनिसपटू असून तिने 8 सप्टेंबर 2024 रोजी अमेरिकन ओपन म्हणजेच अमेरिकी खुली टेनिस स्पर्धा जिंकली.   

9/12

arynasabalenka

दुसऱ्या मानांकित अरिनाने सहाव्या मानांकित जेसिस्का पेगुलाचा 7-5, 7-5 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. तिने पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकली आहे हे विशेष!  

10/12

arynasabalenka

अरिना आणि जेसिस्कादरम्यानचा हा सामना जवळपास दोन तास सुरु होता.  

11/12

arynasabalenka

म्हणजेच अरिनाने तिच्या मेहनतीच्या जोरावर अवघ्या दोन तासांमध्ये भारतीय संघाच्या एकत्रित रक्कमेपेक्षा अधिक रक्कम जिंकली.  

12/12

arynasabalenka

अरिनाची नेट वर्थ म्हणजेच एकूण संपत्ती 20 मिलियन अमेरिकी डॉलर्स म्हणजेच 167 कोटी 97 लाख 32 हजार इतकी आहे.