Holika Dahan 2024 : 'या' लोकांनी होलिका दहनाला राहावं सतर्क? फाल्गुन पौर्णिमेला चंद्राचा प्रभाव कोणासाठी नकारात्मक?

Holika Dahan 2024 : येत्या रविवारी 24 मार्चला देशभरात होलिका दहन करण्यात येत आहे. पंचांगानुसार फाल्गुन पौर्णिमा तिथीला होळी पेटवली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार होलिका दहन हे काही राशींसाठी अशुभ आहे असं सांगण्यात आलंय. 

| Mar 20, 2024, 16:43 PM IST
1/7

आनंदी वास्तू आणि ज्योतिषशास्त्र पंडीत आनंद पिंपळकर यांनी होलिका दहनाच्या दिवस म्हणजे पौर्णिमा तिथी ही कुठल्या राशीच्या लोकांसाठी चांगली नाही, याचं भाकीत केलंय. 

2/7

पिंपळकर सांगतात की, पौर्णिमेला चंद्र 16 चरणांसह प्रकाशित होत असतो. अशा स्थितीत ज्यांच्या कुंडलीतील चंद्र अशुभ स्थितीत असेल त्यांना होलिका दहनचा दिवस वाईट ठरण्याची शक्यता आहे. 

3/7

कन्या

या राशीच्या लोकांना होलिका दहनाचा दिवस भावनिकदृष्ट्या तुम्ही कमजोर असणार आहात. मनातील गोंधळ असल्याने तुम्ही अस्वस्थ करेल. घरात मतभेद होतील आणि खर्चही वाढणार आहे.   

4/7

तूळ

या लोकांनी होलिका दहनाला नवीन काम सुरु करु नका. तुमच्या आत्मविश्वास ढासळणार आहे. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. तुमच्या निर्णय क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.   

5/7

धनु

होलिका दहनाला संयमाने वागा. यादिवशी तुमची चिडचिड होणार आहे. वाद, भांडण होण्याची शक्यता आहे. आरोग्यावरही परिणाम होणार आहे.   

6/7

मकर

होलिका दहनाच्या दिवशी तोंडावर काबू ठेवा. नाहीतर विनाकारण वाद किंवा भांडण्यात अडकाल. तुमच्या नातेसंबंधावरही वाईट परिणाम होतील. या काळात बेकायदेशीर काम करु नका. 

7/7

कुंभ

होलिका दहनाचा दिवशी वैवाहिक जोडप्याच्या आयुष्यात तणाव निर्माण होईल. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर वाद होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी कामात लक्ष द्या. (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)