शरीरातील रक्ताची कमतरता दूर करतील 'या' 6 गोष्टी

आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपल्या आहाराकडे दुर्लक्ष होणे सामान्य झाले आहे. यामुळे अनेक समस्या उद्भवतात. त्यापैकी एक म्हणजे शरीरातील रक्ताची पातळी कमी होणे. विशेषतः महिलांमध्ये रक्ताच्या कमतरतेमुळे अशक्तपणाचा त्रास जास्त प्रमाणात दिसून येतो. परंतु, काही विशिष्ट पदार्थांचा नियमित आहारात समावेश केल्याने शरीरातील रक्ताची पातळी वाढवता येते.    

| Dec 11, 2024, 17:18 PM IST
1/7

बीट:

दररोज बीट खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. हे रक्ताच्या पातळीतील कमतरता भरून काढण्यास उपयुक्त आहे.    

2/7

पालक:

पालकमध्ये व्हिटॅमिन के आणि लोह मुबलक प्रमाणात असते. यामुळे अ‍ॅनेमियासारख्या समस्या दूर होतात आणि रक्ताची पातळी सुधारते. 

3/7

डाळिंब:

हिवाळ्यात डाळिंबाचा आहारात समावेश केल्यास अशक्तपणा दूर होतो. डाळिंब रक्तनिर्मितीसाठी फायदेशीर असते.  

4/7

खजूर आणि मनुका:

खजूर आणि मनुका रोज खाल्ल्याने शरीरातील लोह पातळी वाढते आणि रक्तदाब नियंत्रित राहतो.  

5/7

सफरचंद:

सफरचंद खाल्ल्याने शरीराला लोह मिळते, जे रक्त वाढवण्यासाठी आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.  

6/7

तीळ:

काळे तीळ हे कॅल्शियम, मॅग्नेशियम, तांबे, सेलेनियम आणि व्हिटॅमिन बी 6 आणि ई असल्यामुळे लोहाचे प्रमाण वाढवण्याचा आणखी एक चांगला मार्ग आहे. तीळ थोड्या पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी उठून खावे. यामुळे शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते. 

7/7

शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी या पदार्थांचा आहारात समावेश करा. यामुळे केवळ रक्ताची पातळी सुधारत नाही तर शरीर अधिक निरोगी आणि ऊर्जावानही बनते. (Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही .कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)