IPL 2018 मध्ये हे क्रिकेटर्स निभावणार प्रशिक्षकाची भूमिका

Jan 21, 2018, 09:38 AM IST
1/5

Garry Kirsten joins RCB

Garry Kirsten joins RCB

भारतीय संघाचा माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यंदा रॉयल चॅलेंजर्स बेंगलूर संघाचा फलंदाजी कोच बनला आहे. सोबतच मेन्टॉरपदाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. यापूर्वी 2015 साली कर्स्टन दिल्ली डेअरडेव्हिल्सचे कोच होते.  

2/5

Ashish Nehra joins RCB

Ashish Nehra joins RCB

नुकताच निवृत्ती घेतलेला आशीष नेहरा इंडियन प्रिमियर लीगच्या यंदाच्या पर्वामध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलूर संघाचा गोलंदाजीचा कोच झाला आहे. सोबतच तो संघाचा मेन्टॉर आहे. 

3/5

Ricky ponting joins Delhi

Ricky ponting joins Delhi

ऑस्ट्रेलियन खेळाडू, कर्णधार रिकी पॉन्टिंग यंदा दिल्ली डेयरडेविल्सचा प्रमुख कोच झाला आहे. यापूर्वी रिकी 2013 साली मुंबई इंडियन्स संघातून खेळला. 2008 साली तो कोलकत्ता नाईट रायडर्सचा भाग होता. 

4/5

Mike hussey now coach in CSK

Mike hussey now coach in CSK

ऑस्ट्रेकियाचा धाकड फलंदाज मायकल हस्सी चेन्नई सुपरकिंगचा फलंदाजीचा कोच झाला आहे. यापूर्वी तो चेन्नई सुपरकिंग संघांतून खेळत होता. 

5/5

James Pamment in MI

James Pamment in MI

न्यूझिलंडचा जेम्स पेमेंट मुंबई इंडियन्स संघाचा फिल्डिंग कोच बनणार आहे. जेम्स इंटरनॅशनल स्तरावर खेळला नाही मात्र न्यूझिलंडच्या ऑकलंडमधील 14 प्रथम श्रेणी मॅचमध्ये तो खेळला आहे.