हॅपी बर्थडे सुशांत सिंग राजपूत

Jan 21, 2018, 08:19 AM IST
1/5

Shushant Singh Rajput

Shushant Singh Rajput

सुशांतचा जन्म २१ जानेवारी १९८६मध्ये बिहारची राजधानी पाटण्यामध्ये झाला. त्याचे वडील सरकारी अधिकारी आहेत. २०००च्या सुरुवातीस त्याचे कुटुंब पाटण्याहून दिल्ली येथे स्थायिक झाले. सुशांतला चार बहिणी आहेत. यात मितू सिंग राज्य स्तरावरील क्रिकेट खेळाडू आहे.   

2/5

Shushant Singh Rajput

Shushant Singh Rajput

सुशांतने सुरुवातीचे शिक्षण पाटण्याच्या सेंट कॅरेंस हायस्कूलमधून घेतले. पुढील शिक्षण दिल्लीतील कुलासी हंसराज मॉडेल स्कूलमधून घेतले. त्यानंतर त्याने मेकॅनिकल इंजीनियरिंगचे शिक्षण घेतले. सिनेमात काम करण्यासाठी तो मुंबईत आला. 

3/5

Shushant Singh Rajput

Shushant Singh Rajput

बालाजी टेलिफिल्मसच्या कास्टिंग टीमने पहिल्यांदा सुशांतचा डान्स पाहिला. यामुळे त्याला किस देश है मेरा दिल या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. दरम्यान त्याला खरी ओळख मिळाली ती एकता कपूरच्या पवित्र रिश्ता या मालिकेतून. मानव हे पात्र त्याने साकारले होते.त्याला या मालिकेतील भूमिकेसाठी अनेक पुरस्कार मिळाले.   

4/5

Shushant Singh Rajput

Shushant Singh Rajput

सुशांत सिंग राजपूत जरा  `जरा नच के दिखा 2` आणि `झलक दिखला जा 4`मध्येबी दिसला होता. त्यानंतर सुशांतने सिनेमात काम करण्यास सुरुवात केली. काय पो छे या सिनेमाद्वारे त्याने सिनेकारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर शुद्ध देसी रोमान्स, पीके, राबता या सिनेमांत काम केले.   

5/5

Shushant Singh Rajput

Shushant Singh Rajput

सुशांत सिंग राजपूतसाठी महेंद्रसिंग धोनी हा सिनेमा त्याच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरला. २०१६मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्यापैकी हा चित्रपट होता. लवकरच सुशांत विज्ञानवर आधारित चंदामामा दूर के या सिनेमात दिसणार आहे.