सकाळी शौचामध्ये 'ही' 5 लक्षणे दिसल्यास व्हा सावध! किडनी हळूहळू होतेय डॅमेज
Kidney Damage Symptoms In Stool: किडनी खराब झाल्यावर सुरुवातीची लक्षणे शौचामधून दिसतात.
Early Signs Of Kidney Damage: किडनी हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे आणि रक्त शुद्ध करण्याचे काम करते. किडनी नीट काम करणे थांबवल्यास शरीरातील इतर अनेक प्रमुख अवयवांवर परिणाम होतो. अशा स्थितीत किडनी निरोगी ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, चुकीची जीवनशैली आणि मद्यपान आदींमुळे किडनीच्या आरोग्याला मोठी हानी होते. याशिवाय काही जुनाट आजारांमुळेही किडनीचे आरोग्य बिघडू शकते. किडनी निकामी होण्यापूर्वी शरीरात काही लक्षणे दिसतात. ही लक्षणे योग्य वेळी ओळखून उपचार सुरू केल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो. सकाळच्या स्टूलमध्ये काही बदल देखील मूत्रपिंडाच्या नुकसानाचे लक्षण असू शकतात. स्टूलमध्ये दिसणाऱ्या काही लक्षणांबद्दल सांगणार आहोत. जे किडनी खराब होण्याचे लक्षण असू शकतात.