रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या आवळ्याचे आहेत काही साईड ईफेक्ट

कोरोना काळात आवळ्याची मागणी वाढली होती.   

Feb 06, 2021, 14:28 PM IST

कोरोना काळात व्हिटामीन सी आणि शरीरातील एंटीऑक्सिडेंट्सची पातळी वाढवण्यासाठी प्रत्येक जण आवळ्याचं सेवन करण्यास प्राधान्य देत होते. मोठ्या संख्येत लोक आवळ्याचा ज्यूस आणि मुरब्बा खात होते. तर दुसरीकडे आवळ्यामुळे वजन देखील नियंत्रणात राहण्यास मदत होते. शिवाय अल्सरसारख्या आजारांवर सुद्धा आवळा लाभदायक मानला जातो. पण अनेक अजारांवर उपयुक्त असलेल्या आवळ्याचे काही साईड ईफेक्ट देखील आहेत. 

 

1/5

आवळ्यामुळे शरीरातील फायबरचे प्रमाण नियंत्रित राहते. पण फायबरचं अधिक सेवन केल्यास बद्धकोष्ठताची समस्या आणखीनच वाढू शकते. शिवाय पोटाचे विकार देखील उद्भवू शकतात.   

2/5

आवळ्यामुळे यकृतावर गंभीर परिणाम होऊ शकतो. आवळ्याचे जास्त सेवन केल्यास सीरम ग्लूटामिक पायरुविक ट्रान्समिनेजची मात्रा वाढते. त्यामुळे पचन क्रिया मंदावते.   

3/5

गरोदरपणात आवळ्याचे सेवन केल्यास समस्या निर्माण होवू शकतात. गरोदरपणात आवळा खाणं योग्य आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे गरोदर महिलांनी आवळ्य़ाचं सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेण गरजेचं आहे.   

4/5

सर्दी-खोकल्यासाठी देखील आवळा फायदेशीर नाही. आवळ्याच्या सेवनामुळे शरीरातील तापमान कमी होते. त्यामुळे सर्दी-खोकल्यासाठी आवळा उपयुक्त नाही.   

5/5

रिक्त पोटी आवळा खाल्ला तर तुम्हाला अॅसिडिटीची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे पोटाची समस्या उद्भवू शकते.