बकऱ्यात अडकला गावकऱ्यांचा जीव... म्हणून चक्क काढली त्या बकऱ्याची अंतयात्रा; अख्खं गाव ढसाढसा रडलं

एक असा प्रकार ज्यावर विश्वास बसणे कठीण आहे. लोकांचे बकऱ्यावर होते एवढे प्रेम , की हुंदके देत -देत रडले बकऱ्याच्या अंतयात्रेत . 

Sep 14, 2024, 14:17 PM IST

कधी माणसांच्या अंतयात्रा निघतात तशा प्राण्यांच्या निघालेल्या पाहिल्या आहेत का? वाजत गाजत डीजेसह काढली अंतयात्रा. 

1/7

वेगळीच अंतयात्रा

माणूस आणि प्राणी यांच्यातील जिव्हाळ्याच्या गोष्टी आपण पाहतोच. कुत्रा, मांजर, गाय इतर वन्यप्राण्यांवर त्यांचे मालक-पालक फार जीव लावतात. पण कधी माणसांच्या अंतयात्रा निघतात तशा प्राण्यांच्या निघालेल्या पाहिल्या आहेत का? 

2/7

असे वेगळेच प्राणी प्रेम

अगदी पाळीव प्राण्यांच्या मृत्यूसाठी शोक करणारे लोकसुद्धा असतात. पण कधी कोणत्या प्राण्यासाठी अख्या गावाने अंतयात्रा काढलेली तुम्ही ऐकलं नसेल. एखाद्या व्यक्तीच्या अंत्ययात्रेत राडणार नाहीत, एवढं एका बकऱ्याची अंतयात्रा काढून गावकरी ढसाढसा रडले.   

3/7

विचित्र वाटणारी घटना

हे ऐकायला फार विचित्र वाटत असलं, तरी ही घटना सत्य आहे. हा प्रकार उत्तर प्रदेशातील अमरोहामधील गजरौला येथे असलेल्या पाल नामक गावात घडला.   

4/7

गावकऱ्यांचा जीव बकऱ्यात अडकला

पाल गावातील गावकरी एका बकऱ्याच्या मृत्यूमूळे दु:खात आहेत . एखाद्या माणसाला मिळणार नाही, एवढं प्रेम या बकऱ्यावर गावकऱ्यांनी केलं होतं. गावकरी त्या बकऱ्याची रोज पूजादेखील करायचे .

5/7

गावचा राखणदार

गावकऱ्यांच म्हणणं असं आहे की , हा बकरा गावाचा राखणदार होता. तो गावात दिवसभर फेऱ्या मारून गावावर लक्ष ठेवायचा. तो गेली 15 वर्ष या गावात राहतं होता. त्याला कोणीतरी चामुंडा देवीच्या नावाने गावात सोडून गेलं होतं, तेव्हापासून तो पाल गावातच राहत होता .   

6/7

बकरा देवीचा भक्त

गावकरी सांगतात की, तो सामान्य बकऱ्यांसारखा नव्हता, तो फार खास होता. तो दिवसभर गावात फेऱ्या मारायचा आणि संध्याकाळी चामुंडा देवीच्या पायापाशी जाऊन बसायचा, कारण तो देवीचा भक्त होता. म्हणून चामुंडा देवीची भजने गात-गात बकऱ्याची अंतयात्रा काढली गेली. 

7/7

गाव यात्रेत सामील

गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्या कारणाने गावकऱ्यांनी त्याच्यावर अनेक उपचार केले. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही . म्हणून गावकऱ्यांनी त्याची अंत्ययात्रा वाजत - गाजत काढायचं ठरवलं. आश्चर्याची बाब म्हणजे, पूर्ण गाव यात्रेत सामील झालं.  गावकऱ्यांनी फुग्यांनी त्याची तिरडी सजवली होती. नंतर गंगेच्या काठावर त्याच्यावर विधीवत अंत्यसंस्कारही करण्यात आले.