सूर्य पृथ्वीला गिळणार! कसा होणार सूर्याचा अंत? शास्त्रज्ञांनी केला खुलासा
End of The Sun: खगोलशास्त्रज्ञांना पृथ्वीसारखा दिसणारा एक ग्रह सापडला आहे. त्या ग्रहावरून कोट्यावधी वर्षांनी पृथ्वी नष्ट झाल्यावर कशी दिसेल याचे भयावह चित्र समोर येते.
The sun will swallow the earth: पृथ्वीसारखाच दिसणारा हा ग्रह एकेकाळी राहण्या योग्य होता. जशी पृथ्वी सूर्याभोवती फिरते, तसा तो एका ताऱ्याची परिक्रमा करत होता असं मानलं जात आहे. खगोलशास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की ज्या ताऱ्याभोवती हा ग्रह फिरत होता त्या ताऱ्याचा अब्जावधी वर्षांपूर्वी भयावह अंत झाला. ज्यामुळे हा ग्रह अंतराळात आणखी दूर फेकला गेला.
1/7
काही संशोधनांवरून असे समोर आले आहे, की सुमारे एक अब्ज वर्षांत सूर्यही त्याच्या अंताची प्रक्रिया सुरू करेल. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे, की जेव्हा ही प्रक्रिया सुरू होईल तेव्हा पृथ्वीची अवस्थाही त्या ग्रहा सारखी असेल. जर्नल नेचर ॲस्ट्रॉनॉमीमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, 2020 मध्ये पृथ्वीसारखा एक ग्रह सापडला होता. हा नवीन ग्रह आणि त्याचा तारा पृथ्वीपासून सुमारे 4,000 प्रकाशवर्षे दूर असून आकाशगंगेच्या मध्यवर्ती आहे.
2/7
2020 नंतर कॅलिफोर्निया विद्यापीठातील
खगोलशास्त्रज्ञांच्या पथकाने केक 10-मीटर दुर्बिणीचा वापर करून सुमारे तीन वर्षांनंतर ग्रहाचा पुन्हा अभ्यास केला. हा पृथ्वीच्या आकाराचा ग्रह पांढऱ्या किंवा दाट, उष्ण केंद्र असलेला ताऱ्याभोवती फिरतो. ज्याचा आता अंत झाला आहे. असा अंदाज आहे की ताऱ्याचा अंत होण्यापूर्वी ही ग्रह प्रणाली सूर्याभोवती फिरत असलेल्या पृथ्वीसारखी असावी. कोट्यवधी वर्षांपूर्वी या ग्रहावर जीवन असण्याचीही शक्यता आहे.
3/7
खगोलशास्त्रज्ञांनी 2020 मध्ये या ग्रहाला पाहिले होते तेव्हा तो एका लांबच्या ताऱ्यासमोरून गेला होता. ज्यामुळे त्याची चमक 1 हजार पटीने वाढली. याला ‘मायक्रोलेन्सिंग इव्हेंट’ म्हणतात. जेव्हा एखादी ग्रह प्रणाली ताऱ्यासमोरून जाते, तेव्हा ताऱ्यावरून येणाऱ्या प्रकाशावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ग्रहाच्या प्रणालीचे गुरुत्वाकर्षण लेन्ससारखे कार्य करते. कोरिया मायक्रोलेन्सिंग टेलिस्कोप नेटवर्कच्या संशोधकांनी या घटनेचे विश्लेषण केले. त्यात असे आढळले की पृथ्वीच्या आकाराचा तो ग्रह आणि तारा यांच्यातील अंतर जवळपास पृथ्वी आणि सूर्यातील अंतरा एवढेच आहे. पण हे ग्रह कोणत्या प्रकारच्या ताऱ्याभोवती फिरत हे आहेत निश्चित झालेले नाही.
4/7
अब्जावधी वर्षांनी सूर्याचाही अंत होईल
5/7
पण ही प्रक्रिया सुरू झाल्यावर काय होईल?
6/7
सूर्य पृथ्वीला गिळंकृत करेल का?
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार जेव्हा सूर्याचे आयुष्य संपुष्टात येईल, तेव्हा तो लाल विशालकाय रूप घेईल आणि फुग्यासारखा फुगेल. असे मानले जाते की त्याच्या शेवटच्या टप्प्यात सूर्य बुध आणि शुक्र हे ग्रह गिळेल आणि त्यांना जाळून टाकेल. यामुळे पृथ्वीसारखे जीवन असलेले ग्रह त्यांची कक्षा रुंद करतील. यामुळे पृथ्वी टिकून राहण्याची शक्यता कमी आहे. अशीही शक्यता आहे की जेव्हा सूर्याचा अंत होईल, तेव्हा तो बुध आणि शुक्रासह पृथ्वीलाही गिळंकृत करेल. म्हणजेच आपली पृथ्वी ज्या ताराभोवती फिरत आहे तोच तारा तिच्या नाशाचे कारण असेल.
7/7