आपल्या कोकणात झालयं मुंज्या चित्रपटाचे शुटिंग; प्रत्यक्षात लोकेशन आहे खूपच भारी

Guhagar Beach  'मुंज्या' या चित्रपटाचे शुटींग महाराष्ट्रातील एका सुंदर गावात झाले आहे. पाहूया या गावाचे सुंदर फोटो.

| Jun 28, 2024, 00:07 AM IST

 Munjya  movie shooting in Guhagar Beach  : आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'मुंज्या' या चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाचं बहुतांश शूटिंग हे कोकणात झालंय. जाणून घेऊया कोकणात नेमकं कुठं झाले आहे या चित्रपटाचे शुटिंग. 

1/7

मुंज्या चित्रपटात दाखवण्यात आलेला सुंदर समुद्रकिनारा आणि रहस्यमयी गाव महाराष्ट्रातील कोकणात आहे.  

2/7

 पावसाळी ट्रीप करायची असेल तर गुहागर हे बेस्ट ऑप्शन आहे. समुद्र किनाऱ्यांसह अनेक प्राचीन मंदिरे तसेच जवळपास लहान मोठे धबधबे देखील आहेत. 

3/7

मुंबईहून थेट गुहागरला बसने जाता येते. जवळचे रेल्वे स्थानक हे चिपळूण आहे. 

4/7

 पांढरी वाळू, सुरुची बन आणि दीरवर पसरलेला अथांग समुद्र किनारा... इथं आल्यावर मनाला एक विलक्षण शांतता मिळते. 

5/7

 गुहागरचा समुद्रकिनारा पाहून  मन प्रसन्न होते. चित्रपटात दाखवलं आहे त्यापेक्षा प्रत्यक्षात हा समुद्र किनारा खूपच सुंदर आहे.

6/7

'मुंज्या' या चित्रपटाची कथा कोकणातील आहे. हा चित्रपट एक हॉरर आणि थ्रिलर मूव्ही आहे.  

7/7

'मुंज्या'चं शूटिंग कोकणातील कुडाळ आणि चिपळूणमधील गुहागर येथे झाले आहे.