1 मार्चपासून लागू होणार 'हे' नवे बदल

कोरोनानंतर महागाईने डोकंवर काढलं आहे.  

Feb 28, 2021, 10:56 AM IST
1/5

कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा

कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा

1 मार्चपासून कोरोना लसीकरणाचा तिसर टप्पा सुरू होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे आता सरकारी आणि खासगी रूग्णालयातही लसीकरणाला सुरूवात होणार आहे. एका डोससाठी जास्तीत जास्त 250 रुपये मोजावे लागणार आहेत. सरकारी रूग्णालयात ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना मोफत लस दिली जाणार आहे. तसंच ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेले आणि ज्यांना आधीपासूनच काही आजार आहेत, अशा लोकांना लस मोफत दिली जाणार आहे. पण खासगी रूग्णालयात लस घ्यायची असल्यास २५० रुपये द्यावे लागणार आहेत. 

2/5

विजया आणि देना बँकेत बदल

विजया आणि देना बँकेत बदल

केंद्र सरकारने विजया आणि देना बँकेचे बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण केले आहे. त्यामुळे आता उद्यापासून नवे नियम लागू होणार आहेत. आता तुमाचा जुना IFSC कोड ग्राह्य धरला जाणार नाही. विजया आणि देना बँकेच्या ग्राहकांना नवा IFSC कोड देण्यात येणार आहे. 

3/5

नव्या कोडसाठी काय करावे लागेल?

नव्या कोडसाठी काय करावे लागेल?

विजया आणि देना बँकेचे ग्राहक बँक ऑफ इंडियाच्या www.bankofbaroda.in या वेबसाइटला भेट देवू शकतात. शिवाय बँक ऑफ इंडियाच्या जवळच्या शखेत जावून नवीन IFSC कोड  मिळवू शकतात. 

4/5

सिलेंडरचे दर वाढणार

सिलेंडरचे दर वाढणार

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्या सिलेंडरचे निश्चित करतात. पण फेब्रुवारी महिन्यात दोन वेळा सिलेंडरचे दर वाढवण्यात आले. आता 1 मार्चपासून 794 रूपये मोजावे लागणार आहेत. 

5/5

पेट्रोलचे दर

पेट्रोलचे दर

फेब्रुवारी महिन्यात पेट्रोलचे दर 5 रूपयांनी वाढले. पण महिन्याच्या शेवटच्या दिवशी इंधनात कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही. मात्र उद्या म्हणजे १ मार्चला पेट्रोल किती रूपयांनी वाढलं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.