IND VS ENG: सामन्यानंतर संतापला जो रूट, नेमकं काय घडलं

भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 24 फेब्रुवारीला खेळवण्यात आला. दोन दिवस खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारतीय संघानं विजय मिळवला. 4 सामन्याच्या मालिकेत भारतीय संघानं 2-1 अशी आघाडी घेतली आहे. 

Feb 27, 2021, 17:06 PM IST
1/5

सामना संपताच जगातील सर्वात मोठे नरेंद मोदी स्टेडियमवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. तर तिसरी कसोटी सुरू असताना पहिल्याच दिवशी इंग्लंडला 112 धावांवर तंबूत परतावे लागलं. मोठ्या पराभवाला सामोरं जाव लागल्यानंतर जो रुटने स्टेडियममधील पिचच नाही तर अंपायरच्या निर्णयावर देखील संताप व्यक्त केला. 

2/5

तिसऱ्या कसोटी सामना पहिला डाव समाप्त होताच इंग्लंडाचा कर्णधार जो रुट आणि हेड कोच क्रिस सिल्वरवुडने रेफरी जवागल श्रीनाथ यांच्या सोबत चर्चा केली. 

3/5

सामन्यादरम्यान अंपयारनं निर्णय देताना खूप घाई केल्याचा संताप इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूट आणि क्रिस सिल्वरवूडनं व्यक्त केला. इंग्लंड संघातील प्रवक्ताच्या म्हणण्यानुसार तिसऱ्या अंपायरच्या निर्णयासोबत एकमत असणं गरजेचं आहे. तर रेफरीच्या म्हणण्यानुसार कर्णधार योग्य प्रश्न अंपायरला विचार होता असं देखील सांगितलं जात आहे. 

4/5

भारतीय संघाच्या फलंदाजीची सुरुवात होण्याआधी हा वाद सुरू झाला होता. दुसऱ्या ओवर मध्ये शुभमन गिल पिचवर खेळताना बॅटला बॉल लागून तो बेन स्टोक्सजवळ गेला. त्याने हा बॉल पकडल्यानंतर आऊट झाल्याचा गोंधळ सुरू झाला त्यावेळी थर्ड अंपायरची मदत घेण्यात आली. थर्ड अंपायरनं बॉल ग्राऊंडवर घासून नंतर पकडण्यात आल्याचं दाखवलं. शुभमन आऊट झाला नाही हा निर्णय देण्यात आला. या निर्णयामुळे इंग्लंडच्या संघात नाराजीचा सूर होता. 

5/5

सामन्यातील दुसरी घटना जेव्हा बेन फॉक्सने रोहित शर्माविरूद्ध स्टम्पिंगसाठी अपील केली तेव्हाची घटना घडली. तिसऱ्या पंचांनी भारतीय संघाच्या बाजूने असलेला कोणताही दुसरा अँगल पाहता निकाल दिला तेव्हा त्यावेळी इंग्लंड संघानं नाराजी व्यक्त केली.