BCCI च्या विधानावर या दिग्गज क्रिकेटराने केली टिका, बोलला रोहित आणि कोहली...

kirti Azad statement : बीसीसीआयने जारी केलेल्या नव्या नियमांनुसार साऱ्या खेळाडूंना आता रणजी क्रिकेट (Ranji Cricket) खेळणं आता गरजेचे झाले आहे. यावर इंडियाच्या 1983 वर्ल्ड कप विनिंग टीमचे सदस्य किर्ती आझाद यांनी भाष्य केलं आहे. ते बोलले कि, हा नियम फक्त ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्या पर्यंत मर्यादीत न ठेवता इंडियन क्रिकेट टिमचे स्टार खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) सोबत इंडियन क्रिकेट टिमच्या साऱ्या सदस्यांना लागु व्हायला हवी.

Mar 01, 2024, 17:31 PM IST
1/5

BCCI च्या नव्या नियमानुसार ईशान किशन (Ishan Kishan) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांना सेन्ट्रल कॉन्ट्रॅक्टमधून वगळण्यात आले आहे. बीसीसीआयच्या या निर्णयावर 1983 वर्ल्ड कप विनिंग टीमचे सदस्य किर्ती आझाद हे बोलले की, ह्या पद्धतीचा नियम फक्त अय्यर-किशनपर्यंत मर्यादीत न राहता इंडियन क्रिकेट टिमच्या साऱ्या खेळाडूंना लागु व्हायला हवा. मग ते खेळाडू रोहित असो वा विराट.

2/5

किर्ती आझाद बोलले की, "हा नियम लागु करणं फार चांगली गोष्ट आहे. साऱ्या खेळाडूंनी इंटरनॅशनल क्रिकेटसोबत रणजी ट्रॉफीला ही प्राधान्य द्यायला हवे. प्रत्येक खेळाडू जेव्हाही क्रिकेट खेळत नसेल तेव्हा त्याने रणजी क्रिकेट खेळणं गरजेचे आहे मग तो खेळाडू रोहित शर्मा असो किंवा विराट कोहली.

3/5

किर्ती आझाद यांनी अय्यर आणि किशन यांच्यासोबत घडलेल्या प्रसंगावर भाष्य केले आहे. ते बोलले की, जे काही अय्यर आणि किशनसोबत घडले ते चुकीचे आहे, फक्त त्या दोघांना शिक्षा देणं बरोबर नाही. साऱ्या खेळाडूंना समान नजरेने बघणं गरजेचे आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास साऱ्या खेळाडूंना समान शिक्षा व्हायला हवी.

4/5

आझाद असेही बोलले की, ईशान आणि अय्यर यांच्यासाठी आता सारे दरवाजे बंद झालेले आहेत असेही नाही, पण माझा मुद्दा आहे की, का ते दोघं जास्त प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत नाही? जर त्यांना दोघांना पुरेसे टी-20 क्रिकेट खेळायला वेळ आहे, तर प्रथम श्रेणी क्रिकेटसोबत हा दुजाभाव का?  

5/5

जेव्हा आम्ही क्रिकेट खेळायचो, तेव्हा आमच्या संघाचे सारे सदस्य त्यांच्या राज्याकडून प्रथम श्रेणी क्रिकेटसूद्धा खेळायचे आणि आम्हाला या गोष्टीचा गर्व वाटायचा. यासोबतच त्यांनी ध्रुव जुरेल आणि सरफराज खान यांनी ज्या पद्धतीने टी-20 क्रिकेट आणि टेस्ट क्रिकेटमध्ये संतुलन बनवले आहे, याबद्दल दोघं प्रतिभावान खेळाडूंची किर्ती आझाद यांनी प्रशंसा सुद्धा केली आहे.