दिग्गज व्यावसायिकांच्या मुलीही उद्योग क्षेत्रात अग्रेसर

Nov 19, 2020, 13:05 PM IST
1/6

नंदनी पीरामल

नंदनी पीरामल

उद्योजक अजय पीरामल यांची मुलगी नंदीनी पीरामल Piramal Enterprisesमध्ये कार्यकारी संचालक म्हणून काम पाहते. शिवाय ती ओव्हरर द काउंटर (OTC) उद्योगाचं संपूर्ण कामकाज पाहते. बिझिनेस टुडेने भारताच्या सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीतही नंदानीचा समावेश आहे. शिवाय World Economic Forum कडून ‘Young Global Leader’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. 

2/6

अनन्या बिडला

अनन्या बिडला

उद्योजक  कुमार मंगल यांची मुलगी अनन्या बिडला हिने स्वतःचं वेगळं विश्व तयार केलं आहे. ती एक उत्तम गायक आहे. अनन्याने एक स्वतंत्र मायक्रो फायनान्स कंपनी 'स्वतंत्र प्रायव्हेट लिमिटेड' सुरू केली, जी अनेक राज्यांत काम करते.

3/6

अश्नी बियानी

अश्नी बियानी

फ्यूचर ग्रुपचे चेअरमन किशोर बियाणी यांची मुलगी अश्नी बियाणी वडिलांसोबत खांद्याला खांदा लावून काम करत आहे.   

4/6

वनीषा मित्तल

वनीषा मित्तल

स्टील किंग लक्ष्मी मित्तल यांची मुलगी वनिषा मित्तल तिच्या वडिलांची कंपनी आर्सेलर मित्तलमध्ये नॉन इंडीपेंडेंट डायरेक्टरच्या पदावर काम करत आहे.   

5/6

रोशनी नाडर

रोशनी नाडर

उद्योजक शिव नादर यांची मुलगी रोशनी नादर तिच्या वडिलांची कंपनी एचसीएल ग्रुपमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम करत आहेत. रोशनी नादर यांनाही फोर्ब्सच्या १०० सर्वात सामर्थ्यवान महिलांच्या यादीमध्ये स्थान देण्यात आले आहे.

6/6

ईशा अंबानी

ईशा अंबानी

ईशा अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची मुलगी आहे. वडिलांच्या उद्योगात तिचा देखील महत्त्वाचा वाटा आहे.