तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे मंत्रिमंडळासह महाराष्ट्रात शक्तिप्रदर्शन
केसीआर यांच्या महाराष्ट्र दौ-यामुळे राज्यातले पक्ष मात्र अलर्ट झालेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी काहीच दिवसांपूर्वी केसीआर यांच्यासंबंधी पक्षातील कार्यकर्त्यांना इशारा दिला होता.
BRS Maharashtra mission : बीआरएसचे नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (Telangana Chief Minister K Chandrashekhar Rao) एकीकडं महाराष्ट्रात मोठं शक्तिप्रदर्शन करत आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केलंय. आपल्या अख्ख्या मंत्रिमंडळासह केसीआर महाराष्ट्रात तळ ठोकून आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी मिशन महाराष्ट्र हाती घेतलं आहे.
1/5