नुकतीच सुरु झालेली पाळी 10 दिवस लांबतेय, ऋजुताने सांगितलेले 6 पदार्थ खा Periods मध्ये आराम मिळवा

वयात आलेल्या मुलींसाठी मासिक पाळी आणि त्याच्याशी संबंधित त्रास या सगळ्याच गोष्टी नवीन असतात. अशावेळी नेमकं काय करावं कळत नाही. न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने सांगितल्या खास टिप्स. 

| Sep 01, 2024, 14:03 PM IST

आजकाल खूप कमी वयात मुली वयात येतात. नकळत्या वयात सुरु झालेली मासिक पाळी हा अनेकींना तणाव घेऊन येते. मासिक पाळी दरम्यान शरीरात झालेले बदल आणि त्यावेळी बदलत चाललेली मानसिक स्थिती या सगळ्याच गोष्टी खूप नवीन असतात. अशावेळी नेमकं काय करावं हे कळत नाही. या आणि अशा प्रत्येक प्रश्नावर न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने सांगितल्या तपशीलवार टिप्स. 

1/11

मासिक पाळीत किती त्रास होणे सामान्य?

मासिक पाळीत काही प्रमाणात त्रास होणे हे अतिशय सामान्य आहे. पण त्या त्रास होण्याला मर्यादा असणे गरजेचे आहे. अनेक मुलींना मासिक पाळीत खूप त्रास होतो. त्याचे प्रमाण इतके असते की, दर महिन्याला डॉक्टरकडे गेल्याशिवाय बरच वाटत नाही. तर हा त्रास अजिबात सामान्य नाही. जसे की,  बिछान्यात झोपून राहणे  सतत झोपून राहणे  मानसिक तणाव जाणवणे  ताप येणे  स्पोर्ट्स खेळण्याची इच्छा नसणे  मासिक पाळी आहे म्हणून पडून राहणे 

2/11

मासिक पाळीचा पॅटर्न कसा असावा?

प्रत्येक महिलेचा मासिक पाळीचा एक पॅटर्न असतो. जसे की, पहिल्या दिवशी थोडा रक्तस्त्राव होतो. त्यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी जास्त  रक्तस्त्राव होतो. पण त्यानंतर पुन्हा चौथ्या आणि पाचव्या दिवशी कमी रक्तस्त्राव होतो. ही पाच दिवसांची सायकल सामान्य आहे. पण जर तुम्हाला मासिक पाळी 10 दिवस राहत असेल तर मात्र विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कारण हा रक्तस्त्राव सामान्य नाही. 

3/11

सायकल

सायकलमुळे मासिक पाळीचा त्रास कमी होतो. कारण सायकलमुळे पायाच्या आणि पोटाच्या स्नायूची चांगली एक्ससाईज होते. सायकल मासिक पाळीत चालवल्यास काहीच त्रास होत नाही. 

4/11

आयर्न कडई-तवा

मुलींना आयर्न तव्यामध्ये जेवायला देणे आवश्यक आहे. यामुळे मुलींचे जेवण हे आयर्नच्या कढई बनवावे. तसेच तव्यात पोळी आणि भाकरी करु शकता. या भांड्यांमधून मुलींना आयर्न दररोज मुबलक प्रमाणात मिळते. 

5/11

स्टील-काचेचे डब्बे

मुलींना सुकामेवा खायला द्यावा. अनेक पालक हे देतातही पण या गोष्टी तुम्ही कशामध्ये स्टोअर करता हे सर्वात महत्त्वाचे आहे. पालकांनी या सगळ्या गोष्टी स्टील किंवा काचेच्या डब्यात ठेवाव्यात. प्लास्टिकचा वापर कमी करावा. तसेच मुलींचा शाळेतील डबा देखील स्टीक किंवा काचेचे असेल तर फायदा होतो.   

6/11

नाचणीचा लाडू

मुलींना नाचणी पदार्थ आणि नाचणीचे लाडू मुलींना कमी वयापासूनच खायला द्यावेत. मुलींना कायम ताजे जेवण खायला द्यावे. यामुळे सुकामेवा, लाडू यासगळ्याचा समावेश करावा. तसेच मुलांना योग्य प्रमाणात हिमोग्लोबिन मिळणे आवश्यक आहे. 

7/11

मुठभर शेंगदाणे

मुठभर शेंगदाणे अतिशय महत्त्वाचे पदार्थ आहे. मुलींना दररोज मुठभर शेंगदाणे पालकांनी खायला द्यावे . कारण यामध्ये असलेले गुणधर्म मुलींच्या मासिक पाळीच्या काळात अतिशय महत्त्वाचे ठरतात. इतर पॅकेट फूड खाण्यापेक्षा मुलींना खालील पदार्थ खायला द्या. 

8/11

लिंबू / आवळा सरबत

लिंबू आणि आवळा या फळांमध्ये व्हिटॅमिन सी असते. सॅट्रिकयुक्त असलेले पदार्थ खाल्ले तर त्याचा नक्कीच फायदा होतो. त्यामुळे मुलींना कोल्ड्रिंक्स प्यायला न देता, या सरबतांचा समावेश त्यांच्या डेली रुटीनमध्ये करावा.   

9/11

दही / ताक

दही आणि ताक पचनसाठी फायदेशीर असतात. मासिक पाळीच्या दिवसांत अनेक मुलींना पचनक्रियेच्या समस्या जाणवतात. जुलाब होणे, अपचन होणे असा त्रास होतो. तेव्हा दही किंवा ताक द्यावे.   

10/11

दररोज ताजे फळ / अन्न

मुलींच्या आहारात कायमच ताजे पदार्थ कसे राहतील याची काळजी पालकांनी घ्यावा. जसे की, ताजे फळ. दररोज मुलींना अगदी लहानपणापासूनच ताजे फळ खायला द्यावे तसेच आहार देखील ताजा असावा. शिळे अन्न पदार्थ खायला अजिबात देऊ नका. 

11/11

काय बंद करावे

मुलींच्या पालकांनी कायमच सतर्क असणे गरजेचे आहे. मग ते आहाराच्याबाबतही आले. मुलींना कायमच घरचे ताजे अन्न द्यावे. यामध्ये पॅकेट फूड, पॅकेट ज्यूस, कोल्ड्रिंकचा समावेश असतो. तसेच जंक फूड, पिझ्झा, पास्ता, बर्गर यासारख्या पदार्थांचा समावेश टाळणे आवश्यक आहे.