India vs Pakistan: पाकिस्तानविरूद्ध 'या' Playing XI सोबत मैदानात उतरणार टीम इंडिया, रोहित शर्मा घेणार मोठा निर्णय

India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील T20 वर्ल्डकप 2024 सामना रविवारी भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाईल. भारत-पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना असल्याने चाहते यासाठी फार उत्सुक आहेत. 

Surabhi Jagdish | Jun 08, 2024, 13:10 PM IST
1/7

रविवारी संध्याकाळी 8 वाजता भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे.

2/7

टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताचा पाकिस्तान टीमवर वरचष्मा राहिला आहे. 

3/7

T20 विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण 7 सामने खेळले गेले आहेत. 

4/7

T20 वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध 7 पैकी 6 सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानने एक सामना जिंकला आहे. 

5/7

यंदाच्या वेळी रोहितच्या सेनेचे लक्ष्य टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सातवा विजय नोंदवण्याच्या प्रयत्नात असणार आहे असेल. 

6/7

कशी असेल भारताची संभाव्य प्लेईंग 11- रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.

7/7

कशी असेल पाकिस्तानची प्लेईंग 11- बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), उस्मान खान, फखर जमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, हारिस रौफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, मोहम्मद आमिर, अबरार अहमद/अब्बास आफ्रिदी.