IND vs AFG: अफगाणिस्तानला क्लिन स्वीप देणार टीम इंडिया; प्लेईंग 11 मध्ये होणार 'हे' 3 बदल

India vs Afghanistan 3rd T20i: टीम इंडिया बुधवारी तिसर्‍या आणि शेवटच्या T20 सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध विजयाची सिरीजमध्ये 'क्लीन स्वीप' देण्याच्या उद्देशाने खेळणार आहे. कर्णधार रोहित शर्माकडूनही फॉर्ममध्ये परतण्याची अपेक्षा आहे. 

| Jan 17, 2024, 17:21 PM IST
1/7

टीम इंडियाने ही सिरीज जिंकली आहे. मात्र तिसरा सामना जिंकून भारत व्हाईट वॉश देण्याच्या तयारीत आहे. 

2/7

या सामन्यात भारताच्या प्लेइंग-11 मध्ये तीन बदल पाहायला मिळू शकतात. 

3/7

कुलदीप यादव आणि आवेश खान यांना संधी मिळू शकते. 

4/7

रवी बिश्नोई किंवा वॉशिंग्टन सुंदरच्या जागी कुलदीपला मैदानात उतरवले जाऊ शकते आणि मुकेश कुमारच्या जागी आवेशला संधी देण्यात येण्याची शक्यता आहे.

5/7

याशिवाय विकेटकीपर फलंदाज जितेश शर्मा गेल्या वर्षी रायपूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या सामन्यापासून टी-20 खेळतोय. त्यामुळे त्याला विश्रांती देण्याचा विचार म्हणून संजू सॅमसनला संधी दिली जाऊ शकते.

6/7

दुसरीकडे आजच्या सामन्यात रोहित शर्माच्या कामगिरीवरही खास लक्ष असणार आहे. 

7/7

भारताची संपूर्ण टीम- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सैमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, आवेश खान आणि मुकेश कुमार.