IND vs SA Final : वर्ल्ड कप जिंकताच रोहितसह खेळाडूंच्या डोळ्यात पाणी, पाहा हृदय पिळवटून टाकणारे फोटो

Team India Player get emotional : टीम इंडियाचे 13 वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकला आहे. तर 11 वर्षानंतर आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला.

| Jun 30, 2024, 02:07 AM IST

India Win T20 World Cup 2024 : भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 20 षटकांत 7 गडी गमावून 176 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ 169 धावा करू शकला.

1/5

रोहित शर्मा

स्वप्नपूर्ती झाल्यावर डोळ्यात अश्रू येणार नाहीतर काय...! कॅप्टन रोहितला देखील भावना रोखता आल्या नाहीत.

2/5

रोहित शर्माला अश्रू अनावर

वर्ल्ड कप जिंकताच रोहित शर्माला अश्रू अनावर झाले. रोहित अन् विराट कोहलीच्या डोळ्यात पाणी आलं.

3/5

डोळ्यात आनंदअश्रू

टीम इंडियाच्या विजयानंतर खेळाडूंच्या डोळ्यात आनंदअश्रू आले. हार्दिक पांड्या देखील ढसाढसा रडला.

4/5

सिराजला भावना अनावर

सामना जिंकल्यानंतर बोलताना मोहम्मद सिराजला देखील भावना अनावर झाल्या. कॅमेरासमोर तो देखील ओक्साबोक्शी रडला.

5/5

विराटची निवृत्तीची घोषणा

तर सामनावीर पुरस्कार स्विकारताना विराटने निवृत्तीची घोषणा केली अन् त्याच्या डोळ्यात देखील अश्रू तरळले.