बूट घ्यायलाही पैसे नव्हते, आज आहे कोट्यवधीचा मालक.. जसप्रीत बुमराहची थक्क करणारी संपत्ती

Jasprit Bumrah Net worth : यॉर्करचा बादशाह बुम बुम बुमराह आज टीम इंडियाचा प्रमुख बॉलर आहे. आपल्या भेदक गोलंदाजीने जसप्रीत बुमराहने टीम इंडियाला अनेक सामन्यात विजय मिळवून दिला आहे. भारताचाच नाही तर जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक म्हणून बुमराहकडे पाहिलं जातं.

| Jun 13, 2024, 22:45 PM IST
1/7

भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची जगातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये गिनती होते. 2016 मध्ये टीम इंडियात पदार्पण करणारा जसप्रीत बुमराह क्रिकेटच्या तीनही फॉर्मेटमध्ये दमदार कामगिरी करतोय. बुमराहची गोलंदाजी करण्याची युनिक अॅक्शन आणि अचूक यॉर्कर यामुळे भल्या भल्या फलंदाजांनी त्याची धास्ती घेतलीय. 

2/7

अगदी कमी वेळेत जसप्रीत बुमराहने प्रसिद्धीचं शिखर गाठलंय. 2019 मध्ये त्याला  ICC ODI Player of the Year मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. 2013 मध्ये बुमराहने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्समधून आपल्या प्रवासाची सुरुवात केली. 

3/7

एक वेळ अशी होती की बुमराहकडे क्रिकेटचे बूट घेण्या इतकेही पैसे नव्हते. आज त्याची कोट्यवधीची संपत्ती आहे. बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये A+ ग्रेडमध्ये त्याचा समावेश आहे. यात रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमरहा या मोजक्या खेळाडूंचा समावेश आहे. 

4/7

बीसीसीआयच्या A+ ग्रेडमध्ये समावेश असलेल्या जसप्रीत बुमराहला वार्षिक करारानुसार वर्षाला 7 कोटी रुपये मिळतात. याशिवाय टीम इंडियातर्फे खेळणाऱ्या प्रत्येक कसोटी, एकदिवसीय आणि टी20 सामन्यासाठी त्याला प्रत्येकी 15 लाख, 6 लाख आणि 3 लाख रुपेय फी मिळत.

5/7

रिपोर्टनुसार जसप्रीत बुमराहची नेटवर्थ जवळपास 7 मिलिअन डॉलर म्हणजे भारतीय रुपयात 55 कोटी इतकी आहे. खेळातून मिळणाऱ्या पैशांशिवाय जसप्रीत बुमराहला आयपीएल कॉन्ट्रॅक्ट आणि ब्रँड एंडोरसमेंटचाही समावेश आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी त्याला प्रत्येक हंगामाचे 12 कोटी रुपये मिळतात.

6/7

क्रिकेट शिवाय  बुमराह Dream11, Asics, OnePlus Wearable, Boat, Zaggle, Seagram’s Royal Stag, Estrolo, Cultsport, UNIX आणि Bharat Pe सारख्या काही बड्या बँडच्या जाहीरातही करतो. यातूनही त्याला करोडोंची कमाई होते.

7/7

जसप्रीत बुमराहचा मुंबईत अलिशान फ्लॅट आह. याशिवाय पुण्यात काही प्रॉपर्टी आहे. 2015 मध्ये बुमराहने अहमदाबादमध्ये अलीशान घर विकत घेतलंय. बुमराहकडे Mercedes-Maybach S560,  Nissan GT-R, Range Rover Velar आणि Toyota Innova Crysta कार आहे.