हळदी कुंकू समारंभात सुंदर नथ तर हवीच! सुंदर आणि आकर्षक अशा नथीच्या ट्रेंडिंग डिझाइन्स

सणासुदीला भरजरी साडी, हातात बांगड्या गळात मंगळसूत्रासह दागिना अन् केसात गजरा...पण नथीशिवाय हा श्रृगांर अपूर्णच...मकर संक्रांती हळदी कुंकूवाचा समारंभासाठी खास ट्रेंडिंग असे एकशे एक नथीचे डिझाइन्स पाहून तुम्ही प्रेमात पडाल. 

| Jan 14, 2025, 22:48 PM IST
1/10

पारंपारिक वेशभूषा करताना महाराष्ट्रीय श्रृगांरात नथ ही महत्त्वाची मानली जाते. 

2/10

लग्नात वधूचा नाकात नथ ही महत्त्वाची असते. नथ ही माहेरची असते. असं म्हणतात वधूने आपलं नाक म्हणजे मान सासरच्या लोकांना द्यायचा नसतो. 

3/10

हल्ली बाजारात नथीचे एकशे एक डिझाइन्स आले आहेत. पारंपरिक नथीसोबत तुमच्याकडे या ट्रेंडिंग नथी दागिनींच्या बॉक्समध्ये असायलाच हवी. 

4/10

मासोळीचा आकार असणारी ही एक सुंदर नथ. स्टोन आणि मोती या दोन्हींमुळे ही नथ अतिशय आकर्षक दिसते.

5/10

मोराचे डिझाईन आवडत असेल तर हा एक छानसा पर्याय बघा..  

6/10

बानाई नथ ही फक्त मोत्यांमध्येच दिसत होती. पण आता सोनेरी मण्यांमध्येही ती आली आहे. त्यामुळे बानाई नथीतला हा एक नवा प्रकार तुम्हाला आवडू शकतो.

7/10

मोती आणि खडे यांच्यापासून वेगवेगळ्या आकाराच्या नथी तुमच्या सौंदर्यात अधिक भर घालतात.

8/10

पूर्वी बाजारात पारंपारिक नथ मिळायची. पण आता नथींमध्ये इतक्या डिझाइन्स आल्या आहेत की, तुम्ही तुमच्या लूक आणि दागिनींना मॅचिंग अशी नथ घेऊ शकता. 

9/10

गळ्यातील हार, कानातले आणि बांगड्या यांच्यासोबत शोभून दिसेल अशी आकर्षिक नथ या महिलांना मनमोहन टाकतात. 

10/10

हे डिझाईन तर अगदीच वेगळे आहे. त्यामुळे इतरांपेक्षा काही वेगळं घ्यायचं असेल तर हे बेस्ट ऑप्शन आहे.