महिला नागा साधू अंगावर किती कपडे घालू शकतात? काय असतात नियम?

Female Naga Sadhu : प्रयागराजमध्ये महाकुंभला सुरुवात झाली असून या दरम्यान झालेल्या 'अमृत स्नान' साठी श्रद्धाळूंनी भरपूर गर्दी केली होती. महाकुंभ जवळपास 144 वर्षांनी होत असल्याने लाखोंच्या संख्येने नागा साधू सुद्धा येथे पोहोचले होते. नागा साधूंबद्दल तुम्ही यापूर्वी बऱ्याच गोष्टी ऐकल्या असतील, तेव्हा आज महिला नागा साधूंबद्दल जाणून घेऊयात.   

| Jan 15, 2025, 12:44 PM IST
1/7

नागा साधूंमध्ये अनेक साधू हे वस्त्रधारी तर अनेक साधू वस्त्रविरहित असतात. परनु जेव्हा स्त्रिया संन्यासाची दीक्षा घेता तेव्हा त्यांना देखील नागा बनवले जाते. महिला नागा साधू पूर्ण कपडे घालतात. महिला नागा साधूंना त्यांच्या कपाळावर टिळा लावावा लागतो, त्यांना एकच कपडे घालण्याची परवानगी असते ज्याचा रंग हा मातेरी असतो. 

2/7

न शिवलेले कपडे घालावे लागतात :

 महिला नागा साधू या न शिवलेले कपडे घालतात ज्याला गंती असे म्हटलं जातं. नागा साधू बनण्यापूर्वी महिलांना 6 ते 12 वर्ष ब्रह्मचर्याच पालन करावं लागतं. जेव्हा महिला हे ब्रह्मचर्य पूर्ण करतात तेव्हा त्याला त्यांच्या महिला गुरु त्यांना नागा साधू बनवण्याची परवानगी देतात. 

3/7

जिवंतपणे करावं लागतं स्वतःचं पिंडदान :

महिला नागा साधूंना हे सिद्ध करावं लागत की त्या पूर्णपणे ईश्वराला समर्पित आहेत आणि आता त्यांची सांसारिक आसक्ती संपली आहे. महिला नागा साधूंना स्वतःचे पिंडदान करावे लागते. त्यांना जुनं आयुष्य मागे सोडावं लागतं. आखाड्यांचे सर्वोच्च अधिकारी आचार्य महामंडलेश्वर हे महिलांना संन्यासी बनवण्याची प्रक्रिया पूर्ण करतात. 

4/7

दिवसभर करतात देवाचं स्मरण :

 महिला नागा साधू या भोर नदीमध्ये स्नान करतात, त्यानंतर त्या आपली साधना सुरु करतात. महिला नागा साधू संपूर्ण दिवस देवाची प्रार्थना करतात आणि सकाळी लवकर उठून त्या भगवान शंकराची आराधना करतात. संध्याकाळी या साधू दत्तात्रेय देवाची पूजा करतात.  

5/7

नागा हे ऋषी आणि संतांमध्ये एक उपाधी आहे. साधूंमध्ये वैष्णव, शैव आणि उदासी पंथ आहेत. या तिन्ही पंथांचे आखाडे नागा साधू निर्माण करतात. महिला नागा साधू झाल्यानंतर, सर्व साधू आणि साध्वी तिला माता म्हणतात. माई बडामध्ये महिला नागा साधूंचा समावेश आहे, ज्याला आता दशनाम संन्यासिनी आखाडा म्हणतात.

6/7

नागा साधू हे अन्न म्हणून मुळं, फळं, औषधी वनस्पती आणि अनेक प्रकारच्या पानांचे सेवन करतात. पुरूष नागा साधूंप्रमाणे, महिला नागा साधू देखील अन्न म्हणून अशाच गोष्टींचे सेवन करतात. 

7/7

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे भव्य महाकुंभाला सुरुवात झाली असून 26 फेब्रुवारी रोजी संपेल. यावेळी सुमारे 40 कोटी भाविक गंगा-यमुना आणि सरस्वतीच्या त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करण्यासाठी 45 दिवस चालणाऱ्या महाकुंभात सहभागी होऊ शकतात.