जेव्हा रतन टाटांचा झालेला अपमान, पूर्ण कंपनीच विकत घेतली; जगाने पाहिला भारताचा दबदबा

रतन टाटा यांना एकदा अपमानाचा सामना करावा लागला. पण यानंतर पुढे जे झालं त्यामुळे जगाने भारताचा दबदबा पाहिला.

| Oct 10, 2024, 14:03 PM IST

Ratan Tata Buying Jaguar land Rover: रतन टाटा यांना एकदा अपमानाचा सामना करावा लागला. पण यानंतर पुढे जे झालं त्यामुळे जगाने भारताचा दबदबा पाहिला.

1/10

जेव्हा रतन टाटांचा झालेला अपमान, पूर्ण कंपनीच विकत घेतली; जगाने पाहिला भारताचा दबदबा

Tata Motors and Ford Conflict Ratan Tata Jaguar land rover owner

Ratan Tata Buying Jaguar land Rover:भारतच नव्हे तर जगातील दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाल्यानंतर सारेजण शोक सागरात बुडाले आहेत. रतन टाटा यांचे देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्वाचे योगदान आहे, जे कोणीच विसरु शकत नाही. रतन टाटा यांना लोक परोपकारी म्हणून ओळखतात. त्यांनी स्वत:च जे उदाहरण जगासमोर ठेवलंय. रतन टाटा यांना एकदा अपमानाचा सामना करावा लागला. पण यानंतर पुढे जे झालं त्यामुळे जगाने भारताचा दबदबा पाहिला.

2/10

टाटा मोटर्स लग्झरी ब्रॅण्ड

Tata Motors and Ford Conflict Ratan Tata Jaguar land rover owner

रतन टाटा आपल्या साध्या राहणीसाठी ओळखले जायचे. कार हे त्यांचे पहिलं प्रेम होतं तर पियानो वाजवणं हे दुसरं प्रेम होतं. टाटा सन्स येथून रिटार्टमेंट घेतल्यानंतर ते आपल्या खास शैलीत जीवन जगले. रतन टाटा यांच्या अनेक कहाण्या तुम्ही ऐकल्या असतील टाटा मोटर्सला लग्झरी ब्रॅण्ड बनवण्यात रतन टाटांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे.

3/10

जॅगुआर केली खरेदी

Tata Motors and Ford Conflict Ratan Tata Jaguar land rover owner

रतन टाटा यांनी टाटा मोटर्स लग्झरी ब्रॅण्ड जॅगुआर आणि लॅण्ड रोवर खरेदी केली. पण यामागची कहाणी खूप इंट्रेस्टिंग आहे. दूरदर्श रतन टाटांनी 16 वर्षांपूर्वी टाकलेल्या साहसी पावलामुळे देशाच्या कॉर्पोरेट कहाणीत महत्वाचा अध्याय लिहिला.

4/10

आयकॉनिक ब्रँड्स खरेदी

Tata Motors and Ford Conflict Ratan Tata Jaguar land rover owner

एकेकाळी फोर्ड मोटर कंपनी आर्थिक संकटाचा सामना करत होती, लक्झरी सेगमेंटमध्ये राहण्यासाठी संघर्ष करत होती. तेव्हा टाटा मोटर्सने हा आयकॉनिक ब्रँड्स खरेदी करण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले.

5/10

जगभरात टाटा समूहाचा

Tata Motors and Ford Conflict Ratan Tata Jaguar land rover owner

या निर्णयांमध्ये रतन टाटा यांची दूरदृष्टी दिसून येते. टाटा हे त्यांच्या परवडणाऱ्या वाहनांसाठी ओळखले जात होते. परंतु लँड रोव्हरच्या अधिग्रहणामुळे टाटांना एक नवीन ओळख मिळाली आणि जगभरात टाटा समूहाचा प्रभाव प्रस्थापित करण्यास मदत झाली.

6/10

अपमानाचा बदला कसा घ्यायचा?

Tata Motors and Ford Conflict Ratan Tata Jaguar land rover owner

एक वेळ अशी होती जेव्हा टाटा मोटर्स संकटातून जात होती, त्या वेळी रतन टाटा यांना त्यांची पॅसेंजर कार युनिट विकायची होती. यासाठी रतन टाटा यांनी 1999 मध्ये फोर्डचे मालक बिल फोर्ड यांची भेट घेतली. पण यादरम्यान बिल फोर्डने यांनी असे काही सांगितले जे रतन टाटा कधीच विसरले नाहीत.

7/10

टाटा मोटर्सची पुनर्स्थापना

Tata Motors and Ford Conflict Ratan Tata Jaguar land rover owner

टाटाचा कार बिझनेस खरेदी करून आम्ही एक मोठे उपकार करणार आहोत, असे यावेळी बिल फोर्ड म्हणाले. हे ऐकून रतन टाटा खूप दुखावले गेले. म्हणूनच रतन टाटा यांनी टाटा मोटर्सची पुनर्स्थापना सुरू केली.

8/10

जग्वार लँड रोव्हर खरेदी करण्याचा निर्णय

Tata Motors and Ford Conflict Ratan Tata Jaguar land rover owner

2008 मध्ये रतन टाटा यांनी भारतातील सर्वात स्वस्त टाटा नॅनो कार लॉन्च केली. त्यावेळी फोर्ड मोटर्स वाईट काळातून जात होती. अशा वेळी रतन टाटा यांनी फोर्डची लक्झरी कार ब्रँड जग्वार लँड रोव्हर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. रतन टाटांनी 10 वर्षातच टाटा मोटर्सची स्थापना केली. एवढेच नव्हे तर जॅग्वार खरेदी करून आपल्या अपमानाचा बदलाही घेतला.

9/10

जगात दबदबा

Tata Motors and Ford Conflict Ratan Tata Jaguar land rover owner

टाटा समूहाने ज्या प्रकारे जग्वार सारख्या आलिशान कारचा ब्रँड विकत घेतला. रतन टाटांसाठीच नव्हे तर देशभरातील लोकांसाठी अभिमानाचा क्षण होता. जॅग्वारसारखा ब्रँड भारतीय बनताना पाहून लोकांना खूप अभिमान वाटत होता. याचे संपूर्ण श्रेय रतन टाटा यांच्या कर्तृत्वाला जाते.

10/10

यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम

Tata Motors and Ford Conflict Ratan Tata Jaguar land rover owner

रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला पण त्यासोबतच त्यांनी लोकांना यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करण्याचा संदेशही दिला आहे. त्यांनी नेहमी शांत राहून पडद्यामागे काम केले आणि टाटा समूहाला नवीन उंचीवर नेण्याचे काम केले.