9000 कोटी दान, 150 कोटींचं घर, कोरोनात 2500 कोटी मदत अन्...; रतन टाटांचा पगार किती होता?

Ratan Tata Property, Net Worth, Salary: रतन टाटांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईमधील ब्रीच कॅण्डीमध्ये त्यांचं निधन झाल्यानंतर कुलाब्यामधील त्यांच्या निवासस्थानी पार्थिव नेण्यात आलं होतं. त्यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला जात असताना त्यांच्या संपत्तीसंदर्भातही इंटरनेटवर बरीच चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांची एकूण संपत्ती किती, त्यांच्याकडे कोणत्या गाड्यांचं कलेक्शन होतं, त्यांचा पगार किती होता यावर टाकलेली नजर...

| Oct 10, 2024, 12:28 PM IST
1/13

tatasalaryproperty

रतन टाटा त्यांच्या निधनानंतर मागे किती संपत्ती सोडून गेले? त्यांना किती पगार मिळायचा? त्यांच्याकडे कोणत्या कार्स होत्या? जाणून घेऊयात सविस्तरपणे...

2/13

tatasalaryproperty

जगप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं बुधवारी रात्री मुंबईतील ब्रिच कॅण्डी रुग्णालयामध्ये वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं. मागील बऱ्याच काळापासून ते प्रकृतीसंदर्भातील समस्यांना तोंड देत होते. सोमवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारांदरम्यान त्यांनी बुधवारी अखेरचा श्वास घेतला.   

3/13

tatasalaryproperty

रतन टाटांच्या निधनानंतर त्यांनी मागे किती संपत्ती सोडली आहे? त्यांचा पागर किती होता? त्यांच्या घराची किंमत काय? या सारख्या गोष्टींबद्दल इंटरनेटवर सर्च केलं जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर पाहूयात त्यांच्या संपत्तीचा तपशील...

4/13

tatasalaryproperty

रतन टाटांची एकूण संपत्ती 3 हजार 800 कोटी रुपये इतकी आहे. ही आकडेवारी 2024 ची असून टाटा समुहामधील कंपन्यांमध्ये असलेली त्यांचा वाटा, टाटा सन्समधील भागीदारीमधील वाट्यातून त्यांच्या नावावर इतकी संपत्ती आहे. मात्र त्यांच्या संपत्तीपैकी बरीचशी संपत्ती त्यांनी चॅरेटेबल ट्रस्टला दान केली होती.  

5/13

tatasalaryproperty

रतन टाटांच्या नावावर अनेक ठिकाणी रिअल इस्टेट क्षेत्रातील संपत्ती आहे. मात्र कुलाब्यामध्ये असलेला त्यांचा वंश परंपरागत चालत आलेला सी-फेसिंग बंगला ही सर्वात महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. या बंगल्याची किंमत 150 कोटी रुपये इतकी आहे.

6/13

tatasalaryproperty

रतन टाटांनी अनेक स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केलेली. यामध्ये ओला आणि पेटीएमसारख्या कंपन्यांच्या समावेश आहे. तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ते अनेक स्टार्टअपमध्ये पैसा गुंतवायचे.   

7/13

tatasalaryproperty

रतन टाटांकडे जगातील काही महागड्या कार्स होत्या त्याप्रमाणे सामान्य लोक वापरतात अशा कार्सही होत्या.

8/13

tatasalaryproperty

रतन टाटांकडे नॅनो, इंडिका, नेक्सॉन यासारख्या सामान्य वापरतात तशा कार होत्या. तसेच मर्सिडीज बेन्झ एसएल500, लॅण्ड रोव्हर फ्रिलॅण्डर, कार्डिलीक एक्सएलआर, शेव्हर्लेट क्रोव्हेर्ट यासारख्या महागड्या कार्सही होत्या.

9/13

tatasalaryproperty

रतन टाटांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात 9000 कोटी रुपये दान म्हणून दिले आहेत. प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण, ग्राम विकास आणि सामाजिक कामांसाठी त्यांनी हा पैसा दिला.  

10/13

tatasalaryproperty

हार्वर्ड विद्यापिठातील हॉलचं बांधकाम, क्रोनिल विद्यापिठामध्ये भारतीयांसाठी स्कॉलरशीप, कार्निजीन मेलॉन विद्यापिठामध्ये शिक्षणासाठी देणगीही रतन टाटांनी दिली आहे.  

11/13

tatasalaryproperty

कोरोना काळात रतन टाटांनी टाटा समूह 1500 कोटी रुपये मदतनिधी म्हणून देईल असं जाहीर केलं होतं. मात्र 2021 मध्ये नटराजन चंद्रशेखरन यांनी कंपनीच्या वार्षिक मिटींगमध्ये कंपनीने भारतातील कोरोना मदतनिधी म्हणून 2500 कोटी खर्च केल्याचं म्हटलं होतं. 

12/13

tatasalaryproperty

टाटा सन्समधील शेअर्समधून रतन टाटांना बरेच पैसे मिळायचे. मात्र त्यांनी टाटा सन्सच्या नफ्यामधील 66 टक्के रक्कम दान म्हणून दिली जाईल अशी व्यवस्था केलेली. शिक्षण, ग्रामीण भागातील व्यवस्था, आरोग्य यासारख्या क्षेत्रांमध्ये त्यांनी भरपूर दान केलं.

13/13

tatasalaryproperty

टाटा सन्सच्या माजी अध्यक्षांचा वर्षाचा पगार हा केवळ अडीच कोटी रुपये इतका होता. इतर कंपन्यांच्या मालकांचा पगार पाहता हा आकडा फारच सामान्य आहे. त्यांच्या कमाईमध्ये टाटा सन्समधील शेअर्समधून मिळणाऱ्या डिव्हिडंटचाही समावेश आहे.