कॅनडाविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाची Playing XI ठरली, विराटसह 'हा' खेळाडू बाहेर

T20 World Cup India vs Canada : टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने सलग तीन सामने जिंकत सुपर-8 मध्ये प्रवेश केला आहे. आता टीम इंडियाचा ग्रुपमधला शेवटचा सामना कॅनडाविरुद्ध 15 जूनला खेळवण्यात येणार आहे. हा सामना फ्लोरिडामध्ये रंगणार असून भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सामन्याला सुरुवात होईल. या सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हन काही बदल करण्यात येण्याची शक्यता आहे.

| Jun 14, 2024, 21:43 PM IST
1/7

टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये शनिवारी म्हणजे 15 जूनला टीम इंडियाचा सामना कॅनडाशी होणार आहे. टीम इंडियाचे पहिले तीन सामने न्यूयॉर्कमध्ये खेळवण्यात आले होते. आता चौथा सामना फ्लोरिडामध्ये खेळवला जाणार आहे. पहिल्या तीन सामन्यात टीम इंडियाना आयर्लंड, पाकिस्तान आणि अमेरिकेचा पराभव करत विजयाची हॅटट्रीक केली आहे.

2/7

टीम इंडियाच्या फलंदाजांना न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी क्रिकेट स्टेडिअमवर धावा घेण्यासाठी झुंजावं लागलं होतं. याऊलट भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. जसप्रीत बुमराह (5 विकेट),  हार्दिक पांड्या (7 विकेट) आणि अर्शदीप सिंहने (7 विकेट) विरोधी संघाच्या नाकेनऊ आणले

3/7

पण मोहम्मस सिराज आणि रवींद्र जडेजाची कामगिरी अद्याप म्हणावी तशी चांगली झालेली नाही. त्यामुळे कॅनडाविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियात कुलदीप यादव किंवा युजवेंद्र चहल या फिरकीपटूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. या सामन्यात रविंद्र जडेजाला बेंचवर बसवलं जाऊ शकतं.

4/7

दुसरीकडे विराट कोहलीचा फॉर्मही टीम इंडियासाठी चिंतेचा विषय बनला आहे. विराट कोहलीने तीन सामन्यात भारतीय डावाची सुरुवात केली. पण तीनही सामन्यात तो एकेरी धावांवर बाद झाला. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात 1 धाव, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 4 धावा आणि अमेरिकाविरुद्धच्या सामन्यात विराट शुन्यावर बाद झाला. 

5/7

अशात कॅनडाविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीला विश्रांती देऊन यशस्वी जयस्वालला संधी मिळण्याची शक्यता आहे. यशस्वी जयस्वाल रोहित शर्माबरोबर टीम इंडियाच्या डावाची सुरुवात करु शकतो. तिसऱ्या क्रमांकावर ऋषभ पंत दमदार कामगिरी करतोय. तर चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादवलाही चांगला सूर गवसला आहे.

6/7

हार्दिक पांड्या फलंदाजीबरोबरच गोलंदाजीतही चांगली कामगिरी करतोय. तर अक्षर पटेलही उपयुक्त साबीत होतोय. अशा परिस्थितीत विराट कोहलीला संघात कोणत्या जागी खेळवायचं हा कर्णधार रोहित शर्मासमोर सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे कॅनडाविरुद्धच्या सामन्यात विराटला विश्रांती देण्याची शक्यता आहे. 

7/7

सलग तीन सामने जिंकत टीम इंडियाने सुपर-8 मध्ये प्रवेश केला आहे. 19 जूनपासून सुपर -8 चे सामने सुरु होत असून 20 जूनला टीम इंडिया सुपर-8 मधला आपला पहिला सामना खेळेल. सुपर-8 मध्ये टीम इंडियाचा मुकाबला ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरोधात होणार आहे. तिसरा संघ अद्याप ठरायचा आहे.