नवी लव्ह स्टोरी? एलॉन मस्क-मेलोनींच्या 'Romantic' फोटोने खळबळ; Musk म्हणाला, 'आम्ही...'

Elon Musk Giorgia Meloni Photos Togather: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि जगातील सर्वात महत्त्वाच्या देशांपैकी एकाचं नेतृत्व करणाऱ्या इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधानांचे काही फोटो समोर आले असून या फोटोंची चांगलीच चर्चा आहेत. हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा असून यावर मस्क यांनीच उत्तर दिलंय, पाहूयात नक्की घडलंय काय...

Swapnil Ghangale | Sep 26, 2024, 08:33 AM IST
1/12

muskmaloni

मस्क आणि मेलोनी यांचं चाललंय तरी काय? अशी चर्चा सध्या इंटरनेटवर आहे. असं असतानाच स्वत: मस्क यांनी यासंदर्भात भाष्य केलंय. नेमकं प्रकरण काय? हे फोटो कुठले? हे पाहूयात...

2/12

muskmaloni

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलॉन मस्क आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.  

3/12

muskmaloni

यापैकी एका फोटोमध्ये मेलोनी मस्क यांच्याकडे पाहत असल्याचं दिसत आहे. दोघांचा हा फोटो फारच रोमँटिक असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.

4/12

muskmaloni

मस्क आणि मेलोनी यांच्या व्हायरल फोटोंपैकी एक फोटो शेअर करत सोशल मीडियावर हे दोघे डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे.  

5/12

muskmaloni

खरं तर मस्क आणि मेलोनी या दोघांचे हे फोटो न्यूयॉर्कमध्ये मंगळवारी पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यातील आहे.  

6/12

muskmaloni

याच कार्यक्रमात मस्क यांनी मेलोनी यांना पुरस्कार प्रदान करण्याच्या आधी त्यांचा उल्लेख, "खऱ्या, प्रमाणिक आणि सत्याशी जोडलेल्या" असं म्हटलं आहे.  

7/12

muskmaloni

मेलोनी यांना अॅटलँटिक काऊन्सिल ग्लोबल सिटीझन पुरस्कार मस्क यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी मेलोनी यांचं कौतुक करताना मस्क यांनी, "त्या मानाने दिसतात त्यापेक्षाही अधिक सुंदर आहेत," असं म्हटलं.

8/12

muskmaloni

"जॉर्जिया यांचा मी फार आदर करतो. त्यांनी इटलीच्या पंतप्रधान म्हणून फार उत्तम काम केलं आहे," असं मस्क म्हणाले.   

9/12

muskmaloni

"जॉर्जिया मेलोनी फार प्रमाणिक आहेत. हे प्रत्येक राजकारण्याबद्दल बोलता येत नाही," असंही मस्क म्हणाले. मेलोनी यांनीही एक्स (ट्विटरवरुन) मस्क यांचे आभार मानले.  

10/12

muskmaloni

टेस्ला फॅन क्लबच्या एक्स अकाऊंटवरुन मेलोनी आणि मस्क यांचा याच सोहळ्याती फोटो पोस्ट करत, "तुम्हाला वाटतंय का हे दोघे एकमेकांना डेट करतील?" असं विचारण्यात आलं आहे.  

11/12

muskmaloni

या पोस्टवर 53 वर्षीय मस्क यांनी स्वत: रिप्लाय करताना, "नॉट डेटींग" म्हणजेच आम्ही डेट करत नाहीये, असं म्हटलं आहे.   

12/12

muskmaloni

मेलोनी यांना युरोपीय राष्ट्रांना पाठिंबा देणे आणि इटलीच्या पहिल्या पंतप्रधान झाल्यानिमित्त पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. संयुक्त राष्ट्र समितीच्या बैठकीमध्येही त्या न्यूयॉर्कमध्ये असताना सहभागी झाल्या.