लाल लिपस्टिक..काळा गॉगल आणि डोक्यावर..., सकाळी विमानतळावर दिसली 'ही' अभिनेत्री, तुम्ही ओळखलं का?

ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री रेखा तिच्या स्टाइलसाठी ओळखली जाते. आज सकाळी ती विमानतळावर दिसली. जिथे पुन्हा एकदा तिचा लूक पाहून चाहते थक्क झाले. पाहा फोटो

Soneshwar Patil | Sep 25, 2024, 15:47 PM IST
1/6

अभिनेत्री रेखा

मुंबई एअरपोर्टवर अभिनेत्री रेखा काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सकाळी पोहोचली होती. तिचा या लूकमधील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

2/6

खास लूक

या फोटोमध्ये अभिनेत्रीने काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे. त्यासोबतच गळ्यात पांढरा स्कार्फ घातला असून डोक्यावर काळ्या रंगाचा स्कार्फ घेतला आहे. 

3/6

लाल लिपस्टिक

त्यासोबतच अभिनेत्रीने या फोटोमध्ये लाल लिपस्टिक लावली असून स्पोर्ट्स शूज परिधान केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. 

4/6

चाहते थक्क

मुंबई एअरपोर्टवर वेगळ्या लुकमध्ये पाहून चाहते देखील थक्क झाले होते. सध्या तिचा हा फोटो खूप व्हायरल होत आहे. 

5/6

कमेंट्सचा वर्षाव

रेखाने यावेळी नमस्ते म्हणत पापाराझींना शुभेच्छा देखील दिल्या. चाहत्यांनी तिच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

6/6

वेस्टर्न लूक

रेखा नेहमी पारंपारिक अवतारात दिसत असते. आज देखील अभिनेत्रीचा वेस्टर्न लूक बघायला मिळाला. मात्र, ती कुठे गेली यांची माहिती अद्याप समोर आली नाही.