T20 World Cup: वर्ल्डकपपूर्वीच मोठा उलटफेर; नेदरलँड्सने उडवला श्रीलंकेचा धुव्वा

Netherlands vs Sri Lanka Warm-Up Match: टी-20 वर्ल्डकपला आता अवघ्या काही दिवसांतच सुरुवात होणार आहे. वर्ल्डकपपूर्वी काही देशांचे वॉर्म अप म्हणजेच सराव सामने खेळवले जातायत. टी-20 वर्ल्डकपपूर्वीच एका मोठा उटलफेर पहायला मिळाला आहे. यावेळी दुबळ्या टीमने बलाढ्य टीमला पराभूत करत वर्ल्डकपपूर्वीच सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. 

| May 29, 2024, 18:12 PM IST
1/7

टी-20 वर्ल्डकपपूर्वीच एका मोठा उटलफेर पहायला मिळाला आहे. यावेळी दुबळ्या टीमने बलाढ्य टीमला पराभूत करत वर्ल्डकपपूर्वीच सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. 

2/7

नेदरलँड्सच्या टीमने श्रीलंकेचा 20 रन्सने पराभव केल्याने हा मोठा उलटफेर मानला जातोय. 

3/7

T-20 वर्ल्डकपपूर्वी सराव सामने खेळले जात असून श्रीलंका आणि नेदरलँड यांच्यात सराव सामनाही झाला. 

4/7

वर्ल्डकपपूर्वी खेळवल्या जाणाऱ्या वॉर्म अप सामन्यात नेदरलँड्सने प्रथम फलंदाजी केली. यावेळी लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या टीमला पराभवाचा सामना करावा लागला. रन्सचा पाठलाग करताना श्रीलंका ऑलआऊट झाली. 

5/7

श्रीलंकेने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र हा निर्णय त्यांच्यासाठी फारसा चांगला झाल्याचं दिसलं नाही. यावेळी नेदरलँड्सने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना लंकेचा पराभव झाला. 

6/7

या सामन्यात नेदरलँड्सने श्रीलंकेचा 20 धावांनी पराभव केला. या सामन्यात पहिल्यांदा प्रथम फलंदाजी करताना नेदरलँडने 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावून 181 रन्स केले. 

7/7

लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची संपूर्ण टीम 18.5 ओव्हर्समध्ये 161 रन्सवर ऑलआऊट झाली.