IND vs SL 1st T20 : 'सूर्याला ओळखण्यात चूक झाली...', गंभीरच्या वक्तव्यावर 'कॅप्टन स्काय'ने दिलं खणखणीत उत्तर

Suryakumar yadav On Gautam Gambhir : पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-ट्वेंटी मालिकेला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी कॅप्टन सूर्यकुमार यादवचं वक्तव्य चर्चेत आलं आहे. 

Saurabh Talekar | Jul 26, 2024, 20:50 PM IST
1/5

लिडरची भूमिका

एखाद्या खेळाडूची सर्वोत्तम क्षमता ओळखणं आणि ते जगाला दाखवणं ही लिडरची प्रमुख भूमिका असते, असं गौतम गंभीरने आयपीएलनंतर म्हटलं होतं.

2/5

क्षमतेचा सर्वोत्तम वापर

माझ्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत मला एक खंत असेल तर ती म्हणजे सूर्यकुमार यादवचा त्याच्या क्षमतेचा सर्वोत्तम वापर करू शकलो नाही, असं गौतम गंभीर म्हणाला होता.

3/5

सूर्याचं खणखणीत उत्तर

पहिल्या टी-ट्वेंटी मालिकेपूर्वी जेव्हा सूर्यकुमार यादवला पत्रकारांनी गौतम गंभीरच्या वक्तव्यावर सवाल विचारला तेव्हा सूर्याने खणखणीत उत्तर दिलं.

4/5

हसू आवरेना

अभी तो करेंगे पुरा क्षमता को उपयोग, असं म्हणत सूर्यकुमार यादवने उत्तर दिलं. सूर्याचं उत्तर ऐकून पत्रकारांना देखील हसू आवरलं नाही.

5/5

केकेआर

दरम्यान, मुंबई इंडियन्समध्ये एन्ट्री करण्यापूर्वी सूर्यकुमार यादव केकेआरमध्ये होता. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली तो खेळला देखील आहे. परंतू त्याला जास्त संधी मिळाली नव्हती.