फलंदाजी करताना सूर्याला अंपायरने दिली वॉर्निंग; मैदानात असं काय घडलं?

इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने उत्तम फलंदाजी केल्याचं पहायला मिळालं. मात्र यावेळी एक घटना अशी घडली ज्यावेळी अंपायरकडून वॉर्निंग मिळाली. नेमकं काय आहे हे प्रकरण?

| Oct 30, 2023, 13:17 PM IST
1/7

रोहित शर्माच्या विकेटनंतर सूर्यकुमार यादवने जबाबदारी खांद्यावर घेत धडाकेबाज फटकेबाजी केली. इंग्लंडविरूद्ध त्याने 49 रन्सची खेळी साकारली.

2/7

मात्र सूर्याला यावेळी मैदानातील पंचांनी वॉर्निंग दिली. मैदानात नेमकं यावेळी घडलं तरी का होतं, हे आता समोर आलंय.  

3/7

46 व्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर सूर्याने ऑफ साईडला एक मोठा फटका मारला. 

4/7

सूर्यासमोर यावेळी जसप्रीत बुमराह खेळत होता. यावेळी सूर्याला दुसरा रन काढायचा होता, पण बुमराहच्या मनात असं काही नव्हतं.   

5/7

यावेळी बुमराहने यावेळी दुसरी धाव घेण्यास सूर्याला नकार दिला. यावेळी पीचवर पुढे आलेला सूर्या हा माघारी फिरला. 

6/7

यावेळी अंपायरने सूर्याला वॉर्निंग दिली. कारण सूर्या यावेळी जेव्हा दुसरी धाव घेण्यासाठी सूर्या धावला होता त्यावेळी तो पीचच्या मधल्या भागातून धावत होता. 

7/7

मैदानाच्या मधल्या भागातून जर फलंदाज धावत असेल तर त्यांना अंपायर नेहमीच वॉर्निंग देतात.