हिवाळ्यात नक्की खा 'हे' सुपरफूड; हृदयरोग- डायबिटीससारखे आजार राहतील कंट्रोलमध्ये

Winter Health Tips : आवळा हे एक आयुर्वेदिक फळ असून त्याचे अनेक महत्वपूर्ण फायदे आहेत. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, अँटीऑक्सीडेंट्स आणि अनेक पोषकतत्व आढळतात. खास करून हिवाळ्यात आवळ्याचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. 

| Nov 29, 2024, 20:30 PM IST
1/7

आवळा हा व्हिटॅमिन सी चा समृद्ध स्रोत असून त्यात 600 ते 700 मिलीग्राम व्हिटॅमिन सी असतं, जे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.  हिवाळ्यात आवळा खाण्याचे फायदे जाणून घेऊयात. 

2/7

हृदयासाठी फायदेशीर :

 आवळा हा हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. पोटॅशियम आणि फायबर ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी मदत करतात. आवळ्याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल लेव्हल कमीहोऊन हृदयाला आलेल्या नसांची सूज कमी करते.   

3/7

पचनक्रिया चांगली राहते : आवळ्याच्या सेवनाने बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटीपासून आराम मिळतो. आवळ्याच्या सेवनाने आतडे स्वच्छ होतात. पोटातील बॅक्टेरियांचं संतुलन राखण्यासाठी मदत मिळते.    

4/7

केस आणि त्वचेसाठी लाभदायक :

आवळ्यामुळे केसांची मूळं मजबूत होतात, ज्यामुळे केस गळणे कमी होते आणि केसांना शाईन येते. तर त्वचेसाठीही सुद्धा आवळा खूप फायदेशीर ठरतो. आवळ्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात. 

5/7

डायबिटीस कंट्रोलमध्ये येते :

 सध्या डायबिटीसच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. डायबिटीस नियंत्रणात राहिलं नाही तर इतर आजारांचा धोका देखील वाढतो. आवळ्याचे सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रणात येते. 

6/7

वजन कमी होतं :

आवळा वजन कमी करण्यासाठी सुद्धा प्रभावी ठरू शकते. आवळ्याच्या सेवनाने पचनक्रिया गतिमान होते आणि शरीरातील घाण स्वच्छ होण्यास मदत होते ज्यामुळे वजन नियंत्रणात येतं.  

7/7

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)