Sun Transit 2022: सूर्य गोचर त्रिग्रही योग! या राशींच्या लोकांचे उजळणार भाग्य

Sun Transit in Sagittarius 2022: सूर्य गोचर होत असल्याने काही राशींचा भाग्यदयोग होणार आहे. आज सूर्य आपली रास बदलत आहे. त्यामुळे या 5 राशींच्या लॉटरी लागणार आहे. 

Dec 16, 2022, 15:44 PM IST

Sun Transit 2022: धनु राशीत सूर्य संक्रमण (Surya Gochar) होत आहे. ग्रहांचा अधिपती सूर्य आज धनु राशीत गोचर होत असल्याने अनेक राशींच्या लोकांना याचा लाभ होणार आहे. ग्रहांचा अधिपती सूर्य आज, शुक्रवार, 16 डिसेंबर 2022 रोजी धनु राशीत प्रवेश करत आहे. सूर्यागमनामुळे धनु राशीमध्ये त्रिग्रही योग तयार होत आहे. कारण धनु राशीमध्ये बुध आणि शुक्र आधीपासूनच आहेत. सूर्याच्या राशी बदलामुळे तयार झालेला त्रिग्रही योग 5 राशीच्या लोकांचे भाग्य उजळणार आहे.

1/5

14 जानेवारी 2023 पर्यंत सूर्य धनु राशीत राहून मकर राशीत प्रवेश करेल. दुसरीकडे, बुध आणि शुक्र डिसेंबर 2022 अखेरपर्यंत धनु राशीत राहतील. अशाप्रकारे त्रिग्रही योगामुळे पुढील 15 दिवसांचा काळ पाच राशीच्या लोकांना जोरदार लाभ देईल.  मेष : सूर्य गोचरमुळे मेष राशीच्या लोकांचे भाग्य उजळेल. ते मोठे यश मिळवू शकतात. शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. करिअरच्यादृष्टीने मोठा प्रवास होऊ शकतो. धार्मिकतेकडे कल दिसून येत आहे.

2/5

वृषभ : सूर्य गोचरमुळे तयार होणारा त्रिग्रही योग तुम्हाला सर्वच बाबतीत लाभ देईल. करिअरमध्ये बदल किंवा बढती, पगारात वाढ होऊ शकते. तुमच्या बोलण्यातून तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. उत्पन्न वाढेल.  

3/5

तुळ : सूर्याचे संक्रमण तुळ राशीच्या लोकांना आत्मविश्वास आणि धैर्यवान बनविण्यासाठी हातभार लावेल. तुमचा प्रभाव वाढेल, करिअरमध्ये फायदा होईल. नवीन संपर्क तयार होतील. ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. काही महत्त्वाच्या कामात वडिलांची मदत मिळू शकते. 

4/5

धनु : सूर्य दुसऱ्या राशीतून गोरच होऊन धनु राशीत प्रवेश करत आहे. धनु राशीतच त्रिग्रही योग तयार होत आहे. धनु राशीच्या लोकांना याचा जास्त फायदा होईल. या लोकांना पद, पैसा आणि प्रतिष्ठा मिळेल. सरकारकडून लाभ मिळेल. व्यावसायिकांनाही मोठा फायदा होईल. तुमचे डावपेच यशस्वी होतील. 

5/5

मीन : मीन राशीच्या लोकांनाही सूर्य संक्रमणाचा खूप फायदा होईल. त्यांना टार्गेट पूर्ण करण्यासाठी मदत होईल. त्यांच्या कामातील अडथळे दूर होतील, त्यामुळे व्यावसायिक जीवनात चांगला फायदा होईल. नवीन पद मिळू शकते. शासन किंवा प्रशासनाकडून लाभ होऊ शकतो. तुमच्यात नवीन ऊर्जा संचारेल. तुमच्या नेतृत्वाचे कौतुक होईल. बेरोजगारांना नोकऱ्या मिळतील.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)