Tilgul Vadi Recipe: बिना पाकाची मऊसूत तिळगुळाची वडी; या पद्धतीने कराल तर महिनाभर टिकेल

संक्रात म्हटलं की तिळगुळाचे लाडू आणि वडी हे आलेच. पण अनेकदा तिळगुळ किंवा तिळाची वडी कडक होते किंवा नरम होते.  आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तिळाची मऊसूत वडी. विशेष म्हणजे ही वडी महिनाभर टिकते. 

| Jan 06, 2025, 14:54 PM IST

संक्रात म्हटलं की तिळगुळाचे लाडू आणि वडी हे आलेच. पण अनेकदा तिळगुळ किंवा तिळाची वडी कडक होते किंवा नरम होते.  आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तिळाची मऊसूत वडी. विशेष म्हणजे ही वडी महिनाभर टिकते. 

1/7

Tilgul Vadi Recipe: बिना पाकाची मऊसूत तिळगुळाची वडी; या पद्धतीने कराल तर महिनाभर टिकेल

makar sankranti special 2024 Mau Tilachi Vadi Recipe in marathi

तिळाची वडी ही अगदी कमी साहित्यात होते. तसंच, बरोबर साहित्य वापरुन व प्रमाणात केल्यास खूपच छान होतात. आज आपण महिनाभर टिकणारी बिना पाकाची मउसूत तिळगुळ वडीची रेसिपी पाहुयात. 

2/7

साहित्य

तीळ - १ कप शेंगदाणे - १/२ कप गुळ - दीड कप तूप - २ चमचे

3/7

कृती

सगळ्यात आधी एका कढाईत तीळ चांगले भाजून घ्या. नंतर त्याच कढाईत शेंगदाणे, खोबरं भाजून घ्या. नंतर भाजलेले तीळ, शेंगदाणे मिक्सरमध्ये चांगले बारीक करुन घ्या. आता त्यात भाजलेले खोबरे मिसळून चांगले एकजीव करुन घ्या

4/7

 आता एका ताटाला तूप लावून बाजूला ठेवा. नंतर कढाईत तूप टाकून त्यात एक कप गूळ घेऊन चांगला वितळवून घ्या. 

5/7

 गुळ चांगला वितळला की त्यात तिळाचे मिश्रण घालून घ्या आणि चांगले एकजीव करुन घ्या.   

6/7

आता हे मिश्रण तूप लावून घेतलेल्या ताटात काढा आणि चांगले पसरवून घ्या.

7/7

नंतर चौकोनी किंवा आवडत्या आकाराच्या वड्या पाडून घ्या. आता चार ते पाच तासांसाठी सेट करुन मग खायला घ्या.