PHOTO: सोन्याचं अख्खं विमान, 7000 आलीशान कार; दुबईचा राजा फिका पडेल एवढ्या संपत्तीचा मालक आहे हा सुलतान!

Brunei Sultan Hassanal Bolkiah: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रुनेई आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर आहेत. मोदींच्या या भेटीमुळे ब्रुनेई देश सध्या चर्चेत आला आहे. 

| Sep 04, 2024, 17:55 PM IST
1/6

ब्रुनेई देश

ब्रुनेई देश राजेशाही पद्धती, मूलगामी नियम आणि सुलतान यासाठी ओळखला जातो. येथील बंदर सेरी बेगवान हे येथील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक असून ती या या देशाची राजधानी आहे. 

2/6

जगातील सर्वात श्रीमंत सुलतान

जेव्हा जेव्हा या देशाची चर्चा होते तेव्हा तेथील सुलतानबद्दल देखील चर्चा होते.  या सुलतानचे नाव हसनल बोल्किया असं आहे. तो जगातील सर्वात श्रीमंत सुलतानांपैकी एक आहे. 

3/6

7 हजारांहून अधिक कार

हसनल बोल्किया 59 वर्षे सम्राट आहेत. ते लक्झरी जीवनशैलीसाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. रिपोर्टनुसार, त्याच्या कलेक्शनमध्ये 7 हजारांहून अधिक कार आहेत. 

4/6

600 पेक्षा जास्त रोल्स-रॉयस

या कारची किंमत अंदाजे 5 अब्ज डॉलर्स असल्याचं सांगण्यात येत आहे. GQ च्या अहवालानुसार, सुलतानच्या कार कलेक्शनमध्ये सुमारे 300 फेरारी आणि 600 पेक्षा अधिक रोल्स-रॉयस कार आहेत. 

5/6

सोन्याने मढवलेले जेट

डेली मेलच्या वृत्तानुसार, सुलतानकडे सोन्याने मढवलेले खासगी जेटही आहे. याची किंमत सुमारे 400 दशलश डॉलर्स आहे. त्याचबरोबर सुलतानकडे गोल्ड प्लेटेड रोल्स रॉयस कार देखील आहे. 

6/6

सोन्याचा मुलामा असलेली कार

सुलतान बोल्किया आणि त्याचे राजघराणे ही खास सोन्याचा मुलामा असलेली कार फक्त खास प्रसंगी आणि कार्यक्रमांसाठी वापरतात.