रणवीर बरारची महिन्याची कमाई पाहिलीत का? अर्ध्यात शिक्षण सोडूनही आज सर्वात श्रीमंत शेफपैकी एक

Ranveer Brar Monthly Income And Total Net Worth: आज मुंबई, दिल्ली, गोव्यामध्ये हॉटेलचा मालक असलेला 'मास्‍टर शेफ इंडिया' फेम रणवीर बरारने स्वयंपाक करायला गुरुद्वारेमधील लंगरमधून सुरुवात केली असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. शिक्षण अर्ध्यात सोडणारा रणवीर आज देशातील सर्वात श्रीमंत शेफपैकी एक आहे. तो महिन्याला किती पैसे कमवतो माहितीये का? जाणून घेऊयात रणवीरची एकूण संपत्ती, महिन्याचं इनकम आणि त्याच्यासंदर्भातील काही खास गोष्टी....

Swapnil Ghangale | Jul 09, 2023, 13:10 PM IST
1/21

success story ranveer brar monthly income total net worth

शेफ रणवीर बरारचं नाव तुम्ही ऐकलं असेल. त्याचे काही रेसिपीजचे व्हिडीओही तुम्ही पाहिले असतील. पण रणवीर बरारने शिक्षण अर्ध्यात सोडल्याचं तुम्हाला माहितीये का? शिक्षण अर्ध्यात सोडूनही रणवीर बरारची महिन्याची कमाई किती आहे हे पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. जाणून घेऊयात रणवीर बरारबद्दलच्या काही रंजक गोष्टी...

2/21

success story ranveer brar monthly income total net worth

'मास्‍टर शेफ इंडिया' (MasterChef) या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारताच्या घरातघरात पोहोचलेला चेहरा म्हणजे रणवीर बरार (Chef Ranveer Brar)!

3/21

success story ranveer brar monthly income total net worth

रणवीर बरार तसा आधीपासूनच प्रसिद्ध आहे मात्र 'मास्‍टर शेफ इंडिया'ने त्याच्या चेहऱ्याला नवीन ओळख मिळून दिली.

4/21

success story ranveer brar monthly income total net worth

सेलिब्रिटी शेफ, टीव्ही होस्ट, फूड स्टायलिस्ट असलेल्या रणवीर त्याच्या युट्यूब चॅनेलमुळेही कायमच चांगलाच चर्चेत असतो.

5/21

success story ranveer brar monthly income total net worth

केवळ भारतच नाही तर अमेरिकेबरोबरच कॅनडा आणि इतर देशांमध्येही रणवीरने आपल्या पाककलेचं कौशल्य दाखवलं असून अनेकांना भूरळ पाडली आहे.

6/21

success story ranveer brar monthly income total net worth

रणवीर सध्या भारतातील आघाडीच्या स्वयपाक्यांबरोबरच सर्वात श्रीमंत स्वयंपाक्यांपैकी एक आहे. अर्थात त्याने हे सर्व त्याच्या कष्टाच्या जोरावर कमवलं आहे. 

7/21

success story ranveer brar monthly income total net worth

रणवीरने आपल्या या क्षेत्रातील कारकिर्दीला एका गुरद्वारेमधील किचनपासून सुरुवात केली. आज तो अनेक फाइव्ह स्टार, सेव्हन स्टार हॉटेल्समध्ये आपली सेवा देतो.

8/21

success story ranveer brar monthly income total net worth

रणवीरच्या या प्रवासात अनेक अडचणी आल्या. मात्र रणवीरने आपली जिद्द सोडली नाही आणि अनेक संकटांवर मात करत नाव आणि पैसा कमवला.

9/21

success story ranveer brar monthly income total net worth

1978 साली लखनऊमध्ये रणवीरचा जन्म झाला. रणवीरच्या कुटुंबाच्या मलकीचं एक रेस्तराँ होतं. जेवण आणि स्वयंपाकाबद्दल रणवीरला लहानपणापासून आवडत होती. घरात तो बऱ्याचदा आपल्या आईला जेवणासाठी मदत करायचा.

10/21

success story ranveer brar monthly income total net worth

दर रविवारी रणवीर आपल्या आजोबांबरोबर गुरुद्वारेत जायचा. तिथे त्याचे आजोबा मित्रांबरोबर प्रार्थना करायचे आणि गुरुबाणी गायचे. तर दुसरीकडे रणवीर हा तेथील स्वयंपाक घरात वेळ घालवायचा.

11/21

success story ranveer brar monthly income total net worth

लंगरमधील जेवण खाण्याऐवजी स्वयंपाकघरात जाऊन तो कसा बनवतात हे पाहण्यात रणवीरला जास्त रस होता. तो येथे अनेक छोटी-मोठी कामं करुन लंगर बनवण्यासाठी मदत करायचा. इथूनच त्याच्यातील स्वयंपाक्याला चालना मिळाली.

12/21

success story ranveer brar monthly income total net worth

शालेय शिक्षणानंतर रणवीरने हॉटेल मॅनेजमेंटच्या कोर्ससाठी प्रवेश घेतला. मात्र काही महिन्यांमध्येच त्याने शिक्षण सोडलं आणि आपल्याला शेफच व्हायचं आहे असं ठरवलं. 

13/21

success story ranveer brar monthly income total net worth

घरच्यांना आपण शिक्षण सोडत असल्याचं रणवीरने सांगितलं तेव्हा त्यांना हा निर्णय पटला नाही. रणवीरने शेफ बनावं असं घरच्यांना वाटत नव्हतं. मात्र ते मुलाच्या इच्छेविरोधात गेले नाही आणि त्यांनी त्याला पाठिंबा देण्याचं ठरवलं.  

14/21

success story ranveer brar monthly income total net worth

शेफ होण्याचं स्वप्न उराशी बाळगून रणवीर मुंबईत आला. मुंबईत त्याने आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिवाचं रान केलं. त्याने अनेक ठिकाणी पडेल ती कामं केली. 

15/21

success story ranveer brar monthly income total net worth

बऱ्याच छोट्या-मोठ्या नोकऱ्या केल्यानंतर रणवीरला ताज महल पॅलेज हॉटेलमध्ये शेफची नोकरी मिळाली. या ठिकाणी रणवीरने फार मेहनत घेतली.

16/21

success story ranveer brar monthly income total net worth

रणवीर या ठिकाणी दिवसातील 18-18 तास काम करायचा. त्याच्या मेहनतीचं फळ त्याला मिळालं. त्याला ताज महल पॅलेस हॉटेलमधील बँक्वेट सेवेचा प्रमुख शेफ म्हणून नियुक्त करण्यात आलं. यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही.

17/21

success story ranveer brar monthly income total net worth

रणवीर बरारने परदेशातील अनेक प्रसिद्ध हॉटेल्समध्ये शेफ म्हणून काम केलं आहे. तसेच त्याने स्वयंपाक शिवकणारे क्लासेसही सुरु केले आहेत.

18/21

success story ranveer brar monthly income total net worth

आज दिल्ली, मुंबई आणि गोव्यामध्ये रणवीर बरारची हॉटेल्स आहेत. सध्या तो भारतातील सर्वात श्रीमंत शेफपैकी एक आहे.

19/21

success story ranveer brar monthly income total net worth

शिक्षण अर्ध्यात सोडून जेवणाच्या पॅशनच्या जोरावर यश मिळवणाऱ्या रणवीर बरारची सध्याची एकूण संपत्ती 41 कोटी इतकी आहे.

20/21

success story ranveer brar monthly income total net worth

रणवीर बरार एका महिन्याला जवळजवळ 45 लाख रुपये कमवतो.

21/21

success story ranveer brar monthly income total net worth

हॉटेल उद्योग, युट्यूब आणि इतर कार्यक्रमांना लावलेल्या हजेरीच्या माध्यमातून रणवीर कमाई करतो.