निळ्या नाही भगव्या रंगात दिसणार 'वंदे भारत'! रंग बदलाचं कारण सांगतानाच रेल्वे मंत्र्यांनी दिली 25 Changes ची माहिती
Saffron Colour Vande Bharat Express: केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी त्यांच्या ट्वीटर हॅण्डलवरुन शेअर केलेल्या काही फोटोंमध्ये आता 'वंदे भारत' एक्सप्रेस ट्रेन नव्या लूकमध्ये दिसणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र ट्रेनचा रंग का बदलण्यात आला आहे यासंदर्भातील माहिती रेल्वे अधिकाऱ्यांबरोबरच रेल्वे मंत्र्यांनीही दिली आहे. जाणून घेऊयात काय म्हणाले आहेत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव या बदलासंदर्भात...
1/10
2/10
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय बनावटीच्या या सेमी-हाय-स्पीड वंदे भारत एक्सप्रेसच्या 28 व्या ट्रेनचा रंग भगवा असणार आहे. मात्र अद्याप ही ट्रेन निर्माणाधीन असून तिला फिनिशिंग देण्याचं काम सुरु आहे. सध्या ही ट्रेन चेन्नईमधील इंटीग्रल कोच फॅक्ट्रीमध्ये आहे. याच रेल्वे कारखान्यात सर्व 'वंदे भारत' एक्सप्रेस तयार केल्या जातात.
3/10
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'वंदे भारत' एक्सप्रेसच्या 25 गाड्या देशभरातील वेगवेगळ्या मार्गांवर धावतात. इतर 2 ट्रेन बनवण्याचं काम सध्या सुरु आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी, "28 व्या ट्रेनचा रंग प्रयोग म्हणून बदलण्यात येत आहे. या ट्रेनला भगवा रंग देण्यात आला आहे," असं सांगितलं.
4/10
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी चेन्नईमधील इंटीग्रल कोच फॅक्ट्रीमध्ये जाऊन या ट्रेनच्या कामाची पहाणी केली. 'वंदे भारत' एक्सप्रेसच्या बांधणीबरोबरच दक्षिण रेल्वेमधील सुरक्षा उपाय योजनांची माहिती अश्विनी वैष्णव यांनी घेतली. येथील कर्मचाऱ्यांबरोबर त्यांनी चर्चा केली. त्यांच्याबरोबरचा एक फोटोही अश्विनी वैष्णव यांनी शेअर केला आहे.
5/10
6/10
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी, "ही मेक इन इंडिया ट्रेन आहे. म्हणजेच भारतामध्ये आपल्याच इंजिनिअर्सने आणि तंत्रज्ञांनी ही ट्रेन डिझाइन केली आहे. त्यामुळे 'वंदे भारत' एक्सप्रेसमधील एसी, शौचालय आणि इतर सुविधांसंदर्भात आम्हाला जे काही सल्ले आणि फिडबॅक मिळाला त्यानुसार डिझाइनमध्ये बदल करण्यात आला आहे," अशी माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
7/10
8/10
9/10