Success Story: निव्वळ अशक्यच! IAS अधिकारी बनून अपाला यांनी तोडले सर्व रेकॉर्ड

Pravin Dabholkar | Jul 11, 2023, 16:58 PM IST
1/7

Success Story: निव्वळ अशक्यच! IAS अधिकारी बनून अपाला यांनी तोडले सर्व रेकॉर्ड

Success Story Dr Apala Mishra  UPSC Preparation become IAS

UPSC Success Story: 2020 मध्ये आयएएस अधिकारी बनलेल्यांच्या यादीत अपाला मिश्रा नव्हती. पण तिने हार मानली नाही.आयएएस बनणं हे आपलं स्वप्न आहे आणि ते आपण पूर्ण करणार,यावर तिला विश्वास होता. यासाठी तिने खूप मेहनत घेतली. पदोपदी अपयशाचा सामना केला. 

2/7

व्यवसाय सोडून यूपीएससीची तयारी

Success Story Dr Apala Mishra  UPSC Preparation become IAS

व्यवसाय सोडून प्रशासकीय सेवेत रुजू होण्याच्या दिशेने पाऊल टाकले आणि शेवटी आपल्या कुटुंबाचा आणि जिल्ह्याचे नाव देशभरात पोहोचवले. आज आपण दंतचिकित्सक-आयएएस अपाला मिश्रा यांच्या संघर्षाची कहाणी जाणून घेऊया. 

3/7

तिसर्‍यांदा सर्व रेकॉर्ड मोडले

Success Story Dr Apala Mishra  UPSC Preparation become IAS

अपाला दोनवेळा यूपीएससी अनुत्तीर्ण झाल्या आणि तिसर्‍यांदा त्यांनी सर्व रेकॉर्ड मोडले. अपाला या गाझियाबाद, यूपीच्या रहिवासी आहे. त्या मूळच्या बस्ती जिल्ह्यातील आहेत. आयएएस अपाला यांच्या वडिलांचे नाव अमिताभ मिश्रा असून ते सैन्यात कर्नल पदावरून निवृत्त झाले होते. अपाला मिश्राचा भाऊ अभिषेक मिश्रा लष्करात मेजर आहे.

4/7

डेहराडूनमधून दहावीचे शिक्षण

Success Story Dr Apala Mishra  UPSC Preparation become IAS

लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या आपलाने डेहराडूनमधून दहावीचे शिक्षण घेतले. यानंतर अकरावी आणि बारावीची परीक्षा रोहिणी दिल्लीतून झाली. अपाला मिश्रा यांनी आर्मी कॉलेजमधून बीडीएस उत्तीर्ण करून डेंटिस्टची पदवी मिळवली. अपलाचे स्वप्न काही वेगळेच असले तरी समाजसेवेचे ध्येय ठेवून आपलाने प्रशासकीय अधिकारी होण्याचे ठरवले. 

5/7

प्रॅक्टीस न करता यूपीएससीची तयारी

Success Story Dr Apala Mishra  UPSC Preparation become IAS

वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी प्रॅक्टीस न करता यूपीएससीची तयारी सुरू केली. 2018 मध्ये त्या पहिल्यांदाच UPSC परीक्षेत बसल्या. पहिल्याच प्रयत्नात यश मिळणार नाही याची जाणिव त्यांना होती.

6/7

टॉप 10 मध्ये स्थान

Success Story Dr Apala Mishra  UPSC Preparation become IAS

अपाला यांनी काही काळ कोचिंग घेतले पण नंतर त्यांनी स्वत:चा सुरु अभ्यास केला. दुसऱ्या प्रयत्नातही त्या अपयशी ठरल्या. पण दररोज सात ते आठ तास अभ्यास करून तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. एवढेच नव्हे तर त्यांनी टॉप 10 मध्ये स्थान मिळवले. अपलाचा ऑल इंडिया रँक 9वा होता.

7/7

मुलाखतीत सर्वाधिक गुण मिळवण्याचा विक्रम

Success Story Dr Apala Mishra  UPSC Preparation become IAS

2020 पर्यंत मुलाखत फेरीत सर्वाधिक गुण मिळवण्याचा विक्रम डॉ. अपला यांच्या नावावर आहे. 2019 मध्ये UPSC मध्ये मुलाखत फेरीत 212 गुण मिळवण्याचा सर्वोच्च विक्रम होता. पण, अपलाने हा विक्रम मोडला आणि मुलाखत फेरीत 215 गुण मिळवून नवीन विक्रम केला.