7 दिवसांनंतर संप मागे; बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कोणत्या मागण्या झाल्या मान्य? का पडली कर्मचाऱ्यामध्ये फूट?

बेस्ट कंत्राटी कर्मच्यार्यात मतभेद, मुख्यमंत्र्यांच्या लेखी आश्वासनावर काही कर्मचारी ठाम आहेत. यामुळे काही कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे.

Aug 08, 2023, 22:20 PM IST

BEST Strike : बेस्ट कंत्राटी कर्मचारी संप अखेर मिटलाय..मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईमुळे सात दिवसांनंतर संप मागे घेण्यात आलाय.. प्रमुख मागण्या मान्य झाल्याचं सांगत कर्मचा-यांनी संप मागे घेतला आहे. जाणून घ्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या नेमक्या कोणत्या मागण्या झाल्या आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांनी लेखी आश्वासन द्यावे अशी मागणी काही कर्मचाऱ्यांनी केली आहे. यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये फूट पडली आहे. 

1/7

बेस्ट कंत्राटी कर्मचारी संप अखेर मिटलाय..मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईमुळे सात दिवसांनंतर संप मागे घेण्यात आला आहे. 

2/7

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर संप मागे घेण्याची घोषणा रघुनाथ खजुरकर यांनी आझाद मैदानात येऊन केली. मात्र लेखी आश्वासनासाठी काही कर्मचारी अडून बसलेत.

3/7

प्रमुख मागण्या मान्य झाल्याचं सांगत कर्मचा-यांनी संप मागे घेतला आहे. 

4/7

दिवाळी बोनस, वार्षिक वेतनवाढ या प्रमुख मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या आहेत. 

5/7

कामगारांना भरपगारी वार्षिक रजा मिळणार. 

6/7

कर्मचा-यांच्या बेसिक पगारात वाढ करण्याची मागणी मान्य झालेय. 

7/7