भगवान शिवाच्या 'या' पाच सर्पकन्या; माता पार्वतीलाही नव्हती कल्पना

भगवान शिव आणि पार्वती यांच्या कुटुंबाबद्दल आपल्याला सर्वानाच माहित आहे की त्यांना दोन मुलं होता. पण तुम्हाला माहित आहे का भगवान शिवाला 5 नागकन्या होत्या ज्या बद्दल माता पार्वतीली काही माहित नव्हते.   

Aug 09, 2024, 12:54 PM IST
1/8

नागपंचमीच्या दिवशी या सर्व नागकन्यांची पूजा करणं शुभ मानलं जातं. भगवान शिव त्यांचे पुत्र कार्तिक,गणेश आणि त्यांची कन्या मनसा देवी यांच्या बद्दल आपला सर्वांनाच माहित आहे पण भगवान शिवाला 5 नागकन्या होत्या या बद्दल जाणून घेऊयात.   

2/8

मधुश्रवणी या कथेत भगवान शिव यांच्या सर्व कन्येंचे वर्णन केलेले आहे. नागपंचमीच्या दिवशी या सर्पकन्यांची पूजा केल्याने घरात धन-धान्याची कमतरता भासत नाही त्याचबरोबर अकाली मृत्यूची भीतीसुद्धा राहत नाही. 

3/8

मधुश्रवणीच्या कथेनुसार, एकदा भगवान शिव आणि माता पार्वती तलावाच्या काठावर जलक्रीडा करत होत्या. यावेळी भगवान शंकराला चुकून वीर्यपतन झालं. भगवान महादेवाने ते एका पानावर ठेवलं. त्यातून महादेवाला पाच मुली झाल्या, अशी आख्यायिका आहे. पण, या सर्व मुली मानवी रूपात नसून सापाच्या रूपात होत्या.

4/8

भगवान शिवाने त्यांची नावं जया, विशाहर, शामिलबारी, देव आणि दोताली अशी ठेवली. ज्या दिवशी भगवान शिवाच्या या पाच मुलींचा जन्म झाला तो दिवस म्हणजे श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पाचवा दिवस होता.   

5/8

भगवान शिवाच्या लिलेमुळे या पाच सर्पकन्यांचा जन्म झाला हे पार्वती माहित नव्हते.भगवान शिवाने या मुलींना खूप प्रेमाने वागवले.ते रोज त्यांना भेटण्यासाठी या तलावावर जात असत आणि त्यांच्याशी खेळत असत. 

6/8

एके दिवशी माता पार्वतीने भगवान शंकरांवर शंका केली आणि त्यांचा पाठलाग केला.त्यावेळी तिला भगवान शिव त्या पाच सर्प कन्यांवर पिताप्रमाणे प्रेम करत आहेत आणि त्यांच्या बरोबर खेळत आहेत असे दिसले.   

7/8

त्यावेळी माता पार्वतीला राग आला आणि त्यांनी त्या सर्पकन्यांना मारण्यासाठी पाय वर केला. त्यानवेळी भगवान शिवांनी थांबवले आणि सांगितले की या सर्व तुमच्या मुली आहते. हे ऐकून माता पार्वतीला आश्चर्य वाटले. भगवान शिवाने सर्व घटना माता पार्वतीला सांगितली त्यावेळी माता पार्वतीने जोरजोरात हसायला सुरूवात केली आणि त्या सर्प कन्यांना आपल्या मुली म्हणून स्विकारले. 

8/8

भगवान शिवाच्या आईने माता पार्वतीला असे सांगितले होते की नागपंचमीच्या दिवशी जो कोणी या सर्प कन्यांची पूजा करेल त्याला आणि त्याच्या कुटुंबाला सर्पदंशाची भीती वाटणार नाही.त्याच बरोबर अकाली मृत्यू होणार नाही आणि घरात पैसे व धनधान्याची कमतरता भासणार नाही.