टाटा आणणार भारतीय इतिहासातील सर्वात मोठा IPO? किंमतीमधील शून्य मोजतानाच लागेल दम

Largest IPO In History Of Indian Share Market: टाटा समुहातील कंपन्या शेअर मार्केटमध्ये कायमच चर्चेत असतात. मात्र आता टाटा समुह एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. ही चर्चा आहे भारतीय शेअर बाजारामधील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आयपीओची. या आयपीओच्या माध्यमातून होणाऱ्या शेअर विक्रीचा आकडा पाहूनच तुम्ही थक्क व्हाल. जाणून घेऊयात याबद्दलच...

| Apr 01, 2024, 16:07 PM IST
1/9

Tata To Bring Largest IPO In History Of Indian Share Market

अगदी जेवणातील मिठापासून ते लोखंडापर्यंत आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रापासून गाड्यांपर्यंत अनेक उद्योगांमध्ये असलेला टाटा समूह पुढील वर्षापर्यंत आणखीन एक आयपीओ बाजारामध्ये आणू शकतो अशी दाट शक्यता आहे.

2/9

Tata To Bring Largest IPO In History Of Indian Share Market

हा आयपीओ टाटा समुहामधील सर्वात यशस्वी कंपन्यांपैकी एक असलेल्या टाटा सन्सचा असू शकतो अशी शक्यता आहे. टाटा सन्स ही कंपनी टाटांच्या मालकीच्या कंपन्यांमधील 66 टक्के कंपन्यांमधील भागीदार आणि प्रमोटर आहे. त्यामुळेच टाटा सन्सचा आयपीओ हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ ठरु शकतो.  

3/9

Tata To Bring Largest IPO In History Of Indian Share Market

टाटा सन्स कंपनीचं बाजारमूल्य पाहता हा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ ठरु शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे.  

4/9

Tata To Bring Largest IPO In History Of Indian Share Market

टाटा सन्सची भागीदारी असलेल्या जेवढ्या लिस्टेड कंपन्या आहेत त्यांचे एकूण बाजार मूल्य 16 लाख कोटी रुपये इतकं आहे. कंपनीच्या मालकीच्या नॉन लिस्टेट संपत्तीची किंमत 1 ते 2 लाख कोटींच्या आसपास असण्याची शक्यता आहे.  

5/9

Tata To Bring Largest IPO In History Of Indian Share Market

'मिंट'च्या एका वृत्तानुसार, टाटा सन्स कंपनीचा आयपीओ मार्केटला प्रोत्साहन देण्याचं काम करेल. हा आयपीओ आल्यानंतर टाटा समूह काही लिस्टेड कंपन्या लिक्विडेट करु शकतो असाही एक अंदाज आहे.

6/9

Tata To Bring Largest IPO In History Of Indian Share Market

आतापर्यंत भारतामधील सर्वात मोठा आयपीओ हा एलआयसीचा होता. एलआयसीचा आयपीओ 21 हजार कोटींचा होता. मात्र टाटा सन्सचा आयपीओ एलआयसीच्या दुप्पट असू शकतो. 

7/9

Tata To Bring Largest IPO In History Of Indian Share Market

काही अंदाजांनुसार, टाटा सन्स कंपनीचं बाजारमूल्य हे 96 अब्ज डॉलर्स म्हणजेच 8 लाख कोटी रुपयांच्या आसपास जाऊ शकतं. 8 लाख कोटी रुपये म्हणजे 8 वर तब्बल 12 शून्य. म्हणजेच हा आकडा 8,000,000,000,000 असा दिसेल.  

8/9

Tata To Bring Largest IPO In History Of Indian Share Market

8 लाख कोटी रुपये या किंमतीला टाटा सन्स कंपनीने आयपीओ बाजारात उतरवला आणि कंपनीच्या शेअर्सपैकी 5 टक्के शेअर्स जरी बाजारात विक्रीसाठी काढले तरी आयपीओचे आकारमान हे 40 हजार कोटींपर्यंत जाईल. म्हणजेच हा आयपीओ 400,000,000,000 रुपयांचा असेल.  

9/9

Tata To Bring Largest IPO In History Of Indian Share Market

काही जाणकारांच्या अंदाजानुसार टाटा सन्सचा आयपीओ बाजारात आला तर तो किमान 55 हजार कोटींपर्यंत जाऊ शकतो. मात्र हा आयपीओ यंदाच्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये बाजारात येण्याची शक्यता नाही. मात्र पुढील वर्षी हा आयपीओ बाजारात येऊ शकतो असं सांगितलं जात आहे.