चीन श्रीलंकेकडून 1 लाख माकडं विकत घेणार, प्रत्येकावर खर्च करणार हजारो रुपये, पण कारण काय?

पाकिस्तानकडून (Pakistan) गाढवं (Donkey) खरेदी करणारा चीन आता श्रीलंकेकडून (Sri Lanka) एक लाख माकडं (Monkey) विकत घेणार आहे. श्रीलंका सरकार यासंबंधी योजना आखत आहे. श्रीलंकेचे कृषीमंत्री महिंदा अमरवीरा यांनी चीनने 1 लाख माकडं निर्यात करण्याची विनंती केली असल्याचं सांगितलं आहे.  

Apr 18, 2023, 18:57 PM IST
1/7

पाकिस्तानकडून (Pakistan) गाढवं (Donkey) खरेदी करणारा चीन आता श्रीलंकेकडून (Sri Lanka) एक लाख माकडं (Monkey) विकत घेणार आहे. श्रीलंका सरकार यासंबंधी योजना आखत आहे. श्रीलंकेचे कृषीमंत्री महिंदा अमरवीरा यांनी चीनने 1 लाख माकडं निर्यात करण्याची विनंती केली असल्याचं सांगितलं आहे. चीनला जास्तीत जास्त माकडं हवी आहेत. यासाठी ते पैसाही खर्च करण्यास तयार आहेत. यासंबंधी चीनची श्रीलंकेसोबत तीन स्तरांवर चर्चा झाली आहे.   

2/7

चीन या माकडांना वेगवेगळ्या ठिकाणी एक हजार प्राणीसंग्रहालयात ठेवणार आहे. कृषीमंत्र्यांनी, चीनला प्राणीसंग्रहालयात ठेवण्यासाठीच ही माकडं हवी असल्याचं सांगितलं आहे.   

3/7

श्रीलंकेत माकडांची लोकसंख्या 30 लाखांच्याही पुढे गेली आहे. हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. हीच माकडं पिकांचीही वाट लावत आहेत. तसंच गेल्या एक वर्षात दोन कोटी नारळांचं नुकसान केलं आहे.   

4/7

माकडांमुळे अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान होत आहे. स्थानिक प्रशासन माकडांची लोकसंख्या कमी करण्यासाठी अनेक उपाय आखत आहे. दुसरीकडे चीनच्या कर्जात बुडाले असल्याने श्रीलंका नकारही देऊ शकत नाही  

5/7

श्रीलंकेत खरं तर कोणत्याही जिवंत प्राण्याच्या निर्यातीला बंदी आहे. पण चीनने अशावेळी मागणी केली आहे, जेव्हा श्रीलंका आर्थिक संकटाचा सामना करत आहे. दरम्यान श्रीलंकेने प्राण्यांच्या या यादीतून माकडांच्या तीन प्रजाती, मोर आणि जंगली डुकरांना काढलं आहे.   

6/7

दरम्यान काहींना भीती आहे की, चीन या माकडांचा खाण्यासाठीही वापर करु शकतं. यांचं मांस विकलं जाण्याची शक्यता आहे. श्रीलंकेच्या कृषीमंत्र्यांनी मात्र यासाठी नकार दिला आहे.   

7/7

चीन या माकडांच्या निर्यातीचा खर्चही उचलणार आहे. एक माकडाला पकडण्यासाठी श्रीलंकेच्या मूल्यानुसार पाच हजारांचा खर्च येतो. चीन प्रत्येक माकडासाठी 30 ते 50 हजारांचा खर्च करणार आहे. यामध्ये माकड पकडणं, तपासणी करणं, पिंजऱ्यात ठेवणं आणि निर्यात हा सगळा खर्च असेल.