Hemangi Kavi: 'बाई, बूब्स आणि ब्रा' पोस्टनंतर हेमांगी कवीने सांगितला धक्कादायक प्रसंग, म्हणाली "माझ्या रंगामुळे मला..."

hemangi kavi faced rejection because of dark skin: माझ्या रंगामुळे मला 6 प्रोजेक्टसाठी नकार देण्यात आला होता, असं हेमांगी म्हणते. अभिनयाच्या जोरावर काम मिळवूया, हे मी ठरवलं होतं, असं हेमांगीने एका कार्यक्रमात म्हटलंय.

Apr 18, 2023, 17:23 PM IST

Marathi Actress Hemangi Kavi: प्रसिद्ध मराठी अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) नेहमी तिच्या पोस्टमुळे (Hemangi Kavi Post) चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिची 'बाई, बूब्स आणि ब्रा' ही पोस्ट चांगलीच चर्चेत राहिली होती. राजकीय वर्तुळातून देखील यावर भाष्य करण्यात आलं होतं. हेमांगीच्या या पोस्टमुळे अनेकांचा बाईकडे दृष्टीकोन नक्कीच बदलला. अशातच आता हेमांगी कवीने एक धक्कादायक प्रसंग सांगितला. 

1/5

बॉलिवूड असो वा मराठी चित्रपटसृष्टी प्रत्येकाला इथं संघर्ष करावाच लागतो. काहींना त्यांच्या कलाकारीमुळे तर काहींना रंगामुळे डावलण्यात येतं. याच विषयावर हेमांगीने एका कार्यक्रमात भाष्य केलं आहे.

2/5

माझ्या रंगामुळे मला 6 प्रोजेक्टसाठी नकार देण्यात आला होता, असं हेमांगी म्हणते. अभिनयाच्या जोरावर काम मिळवूया, हे मी ठरवलं होतं. मला सावळ्या रंगावरुन खूप वेळा नकार देण्यात आला, असं तिने प्लॅनेट मराठीच्या एका शोमध्ये सांगितलं.

3/5

गोरी, उंच, घारी अशी छान दिसणारी अभिनेत्री, असं समीकरण असतं. मी स्वत:ला हिरोईन म्हणून कुठेही बघत नव्हते. छोट्या मोठ्या पात्रात मला समाधान मिळतं, असंही ती म्हणाली.

4/5

एका चॅनलने तर धक्कादायक कारण सांगितलं, आमच्या पूर्ण इतिहासात आमची अभिनेत्री काळी नव्हती. काही वर्षांनी तेच सहा प्रोजेक्ट गोऱ्या मुलींना देण्यात आले, असं हेमांगी म्हणते.

5/5

दरम्यान, मी रंग तर बदलू शकत नाही. अभिनयाची काही समस्या नाही ना? असं म्हणत हेमांगीने खडे बोल सुनावले होते. समाजाची नजर बदलली पाहिजे, असं परखड मत हेमांगी नेहमी मांडत असते.