SRH vs RCB : चिन्नास्वामीवर षटकारांचा पाऊस, हैदराबादने रचला इतिहास; 11 वर्षांचा 'तो' रेकॉर्ड मोडला...!

Most sixes by a team in an innings : चिन्नास्वामी मैदानावर हैदराबादने 3 विकेट गमावून 287 धावांची मोठी धावसंख्या उभारली. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली आहे.

Saurabh Talekar | Apr 15, 2024, 21:50 PM IST

SRH records most sixes vs RCB : हैदराबाद संघाने मुंबई इंडियन्सविरुद्ध 277 धावांची ऐतिहासिक धावसंख्या उभारली होती. आता त्याने स्वतःचाच विक्रम मोडला. त्याचबरोबर हैदराबादने आणखी एक रेकॉर्ड मोडून काढलाय.

1/7

39 चेंडूत शतक

हैदराबादचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने 39 चेंडूत शतक झळकावलं. तो आयपीएल इतिहासातील सर्वात जलद शतक ठोकणारा खेळाडू ठरला.

2/7

एका इनिंगमध्ये सर्वाधिक सिक्स

हैदराबाद संघाने आयपीएल इतिहासातील एका इनिंगमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड नावावर केलाय.

3/7

MI vs SRH - 2024

हैदराबाद आणि आरसीबी यांच्यातील सामन्यात सर्वाधिक 22 सिक्स मारण्याचा विक्रम रचला गेला आहे. ट्रेविस हेडने 8 सिक्स अन् क्लासेनने 7 सिक्स मारले. तर अब्दुल समदने 3 सिक्स मारले.  

4/7

RCB vs PWI - 2013

त्याआधी आरसीबी आणि पुणे वॉरियर्स इंडिया यांच्यातील सामन्यात 21 सिक्स खेचण्यात आले होते.

5/7

RCB vs GL - 2016

आरसीबी आणि गुजरात लायएन्स यांच्यात 2016 मध्ये झालेल्या सामन्यात 20 षटकारांचा पाऊस पडला होता.

6/7

DD vs GL - 2017

दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि गुजरात लायन्स यांच्यातील 2017 मधील सामन्यात देखील 20 षटकार ठोकले गेले होते.

7/7

MI vs SRH - 2024

तर यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्स आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यात मुंबईने 20 सिक्स मारले होते.